mamata banarjee
mamata banarjee 
देश

शहांचे आरोप म्हणजे खोट्या आरोपांचा कचरा; ममता बॅनर्जी यांचे टीकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

कोलकता - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्‍चिम बंगालमधील वीरभूम येथे रोड शो घेत राज्यातील तृणमूल काँग्रेसला आव्हान दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही उद्या तिथेच सभा घेण्याचे जाहीर करत प्रतिआव्हान दिले आहे. शहा यांनी राज्याच्या विकासावर केलेली टीका म्हणजे केवळ खोट्या आरोपांचा कचरा असल्याची टीका त्यांनी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम बंगालमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

अमित शहा यांनी दोन दिवासांच्या दौऱ्यात ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर घणाघाती टीका केली होती. हे सरकार भ्रष्टाचारात नंबर वन असल्याचा आरोपही शहा यांनी केला होता. राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे, तर तृणमूल काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना ममता यांनी आपल्या सभेची घोषणा केली. त्या म्हणाल्या, ‘‘वीरभूमला मी पुढील आठवड्यात प्रशासकीय कामासाठी जाणारच आहे, तर २९ ला मी तिथे सभाही घेईन. मी अमित शहा यांना सांगू इच्छिते की, तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या खोट्या माहितीची शहानिशा न करताच तुम्ही आरोप केले. तुम्हाला हे शोभत नाही. तुम्ही काल राज्याच्या विकासाबाबत जे सांगितले ते खोट्या आरोपांचा कचरा होता.’’

ममता बरसल्या
- आम्ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांत ‘नंबर वन’
- ग्रामीण रस्ते विकासातही ‘नंबर वन’
- भाजप हा ‘चिटींगबाज’ पक्ष; राजकारणासाठी काहीही करतील
- आमचा ‘सीएए’ला विरोध कायम
- भाजपला राज्यातील जनतेचे भवितव्य ठरविता येणार नाही.

चार मुख्यमंत्र्यांना धन्यवाद
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांप्रकरणी राज्याने मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी चार मुख्यमंत्र्यांचे आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांचे आभार मानले. ‘केंद्र सरकार राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करत आहे. त्यांना विरोध करण्याच्या माझ्या भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल मी भूपेश बघेल, कॅप्टन अमरिंदर सिंग, अशोक गेहलोत, अरविंद केजरीवाल आणि एम. के. स्टॅलिन यांचे आभार मानते. धन्यवाद,’ असे ट्वीट त्यांनी केले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT