Mamata Banerjee on Netaji Subhashchandra Bose 125 birthday e sakal
देश

नेताजींचा जन्मदिवस राष्ट्रीय सुट्टी घोषित करा - ममता बॅनर्जी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती (Netaji SubhashChandra Bose 125 Birth Anniversary) आहे. त्यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमिवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.

देशनायक दिवस योग्य पद्धतीने साजरा करण्यात यावा आणि राष्ट्रीय नेत्याला आदराजंली वाहण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारला (Modi Government) केली आहे.

पंतप्रधान मोदींनीही वाहिली आदरांजली -

पंतप्रधान मोदींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच नेताजींना त्यांनी आदरपूर्ण श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नेताजींना आदरांजली वाहिली.

इंडिया गेटवर बसवणार नेताजींचा पुतळा -

दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. देश नेताजींची १२५ जयंती साजरी करत आहे. त्यानिमित्त हा पुतळा बसविण्यात येणार असून तोपर्यंत इथं होलोग्राम पुतळा ठेवण्यात येणार आहे. नेताजींचा ग्रॅनाईटचा पुतळा 28 फूट उंच आणि सहा फूट रुंद असेल आणि 1968 मध्ये हटवण्यात आलेला किंग जॉर्ज पंचम यांचा पुतळा असलेल्या मंडपात त्याची स्थापना केली जाईल. आज पंतप्रधान या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण करतील, असंही त्यांनी सांगितलं होतं. अमर जवान ज्योतीच्या विलनीकरणावरून विरोधकांनी सरकारव खूप टीका केली. या प्रकरणावरून राजकारण तापलं असताना पंतप्रधान मोदींनी नेताजींचा पुतळा बसवण्याची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT