Mamata Banerjee Government esakal
देश

Supreme Court चा ममता बॅनर्जी सरकारला मोठा दिलासा; CBI चौकशीच्या आदेशावर घातली बंदी

कोलकाता उच्च न्यायालयानं शाळा भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता उच्च न्यायालयानं शाळा भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) कथित शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी (School Recruitment Scam) ममता बॅनर्जी सरकारला (Mamata Banerjee Government) सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे.

शालेय सेवा आयोगातील (School Service Commission) कथित भरती घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलीय. एवढंच नाही तर या प्रकरणी पश्चिम बंगालचे प्रधान सचिव मनीष जैन (Manish Jain) यांच्या वैयक्तिक हजर राहण्यासही सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातलीय. कोलकाता उच्च न्यायालयानं शाळा भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

17 नोव्हेंबरला कोलकाता उच्च न्यायालयानं (Calcutta High Court) पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्याची चौकशी करणार्‍या केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या (CBI) विशेष तपास पथकातून (SIT) दोन अधिकार्‍यांना निलंबित केलं आणि चार नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. न्यायालयानं एसआयटीचे प्रमुख म्हणून उपमहानिरीक्षक (डीआयजी) नियुक्त केलं. हे प्रकरण शालेय सेवा आयोगाद्वारे अनुदानित सरकारी शाळांमधील गट III आणि IV कर्मचारी, शिक्षकांच्या भरतीमधील कथित अनियमिततेशी संबंधित आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी गेल्या सुनावणीत सांगितलं की, सीबीआय या प्रकरणात अतिशय संथ गतीनं काम करत असून याचं कारण त्यांना चांगलंच माहीत आहे. पाच महिन्यांपूर्वी एसआयटीची स्थापना होऊनही गट 4 मधील बेकायदेशीर नोकरी शोधणाऱ्या 542 पैकी केवळ 16 जणांचीच चौकशी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

25 मार्चपासून 'या' राशींचा गोल्डन टाईम सुरू ! राजासारखं जगणार आयुष्य ; पैसा, गाडी, करियर सगळ्यात होणार प्रगती

SCROLL FOR NEXT