mamata banerjee will boycott opposition meeting against caa 
देश

सोनिया गांधींपुढे पेच; सीसीएप्रकरणी ममता बॅनर्जींचा धक्कादायक निर्णय 

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता (Kolkata) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरातून आंदोलने होत आहे. या कायद्याच्या विरोधात सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न दिल्लीतील विरोधक करत आहे. पण, आता या विरोधकांच्या एकीमध्ये फूट पडत असल्याचं दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee) यातून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. 

ममतांचा बैठकीला का विरोध?
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यानी विरोधकांची वज्रमूठ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या अंतर्गत येत्या 13 जानेवारीला दिल्लीत विरोधी पक्षांची एक व्यापक बैठक बोलवण्यात आलीय. या बैठकीला उपस्थित राहण्यास ममता बॅनर्जी यांनी नकार दिल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी बुधवारी (8 डिसेंबर) देशभरात बंदची हाक दिली होती. त्या बंदला पश्चिम बंगालमध्ये हिंसक वळण लागले होते. त्यावरून ममता बॅनर्जी भडकल्या असून, त्यांनी या बंद संदर्भात काँग्रेसचा निषेध म्हणून, बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिलाय. बंदमधील हिंसक आंदोलनाचे आम्ही समर्थन कर नाही, असं ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या विधानसभेत स्पष्ट केलंय.

काय घडलं पश्चिम बंगालमध्ये?
ट्रेड युनियनच्या बुधवारच्या 24 तासांच्या बंद वरून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्यांवर टीका केलीय. ज्या राजकीय पक्षांचे अस्तित्वच नाही ते आंदोलन करत आहेत, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावलाय. बंद सारख्या मार्गांचा अवलंब करून, हे राजकीय पक्ष राज्याच्या अर्थव्यवस्थेला धक्का देत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारचे आर्थिक धोरण, सीएए आणि प्रस्तावित एनआरसीच्या विरोधात बुधवारी ट्रेड युनियनच्या वतीने देशभरात बंद पाळण्यात आला. बंगालमध्ये सकाळीच कोलकात्याच्या काही भागात या बंदला हिंसक वळण मिळाले. उत्तर 24 परगना जिल्ह्यात डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको केला होता. रेल्वेच्या रुळांवर देशी बॉम्ब सापडल्याचा आरोप रेल्वे पोलिसांनी केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! सोनं-चांदी आणखी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

April 2026 Calendar: हनुमान जयंती, अक्षय तृतीया ते सीता नवमी; आंब्याच्या मोसमातील खास सण आणि महत्त्वाचे दिवस जाणून घ्या

SCROLL FOR NEXT