man break wifes spine after she defeats him in ludo game at gujrat 
देश

खेळात हरवल्याने नवऱयाने मोडला बोयकोच्या पाठीचा कणा...

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे अनेकजण घरामध्ये बसून वेळ घालवताना दिसत आहेत. मात्र, यामुळे कौटुंबिक वाद निर्माण होताना दिसतात. 'लूडो' नावाचा ऑनलाइन खेळामध्ये पत्नीने हरवल्यानंतर चिडलेल्या पतीने पत्नीच्या पाठीचा कणा मोडल्याची घटना येथे घडली.

ही घटना '181 अभयम हेल्पलाइन'मध्ये आलेल्या तक्रारीनंतर समोर आली आहे. पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वेमाली येथे राहणारी एक 24 वर्षीय महिला घरात शिकवणी घेते. नवरा एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉकडाऊनमुळे नवरा घरीच आहे. नवऱयाने घराबाहेर न जात घरामध्ये थांबावे, यासाठी पत्नीने मोबाइलवर लूडो गेम खेळू म्हणून सांगितले. लुडो गेम खेळत असताना नवरा सलग चार वेळा हरला. यामुळे चिडल्यानंतर त्याने वाद घालायला सुरवात केली. वाद एवढा वाढला की त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत पत्नीच्या पाठीचा कणा मोडला. यानंतर त्याने पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, पत्नीने घरी जाण्यास नकार देत माहेरी जाण्याची तयारी केली होती. पण, दोघांच्या समुपदेशनानंतर पतीने पत्नीची माफी मागितल्यामुळे पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा घरी जाण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर पत्नीला पुन्हा मारहाण न करण्याची ताकीद '181 अभयम हेल्पलाइन'कडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Reality Explained: नेपाळ सरकारचं खरंच चुकलं की Gen Z चा अभ्यास कमी पडला? खरं वास्तव काय?

Beed Crime : बीडमध्ये वडिलांनंतर ३ वर्षीय चिमुकलीचाही संशयास्पद मृत्यू, झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

आनंदाची बातमी! 'साेलापूर जिल्ह्यात पाेलिस दलात २२५ पदांची भरती'; सप्टेंबरअखेर भरा अर्ज, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ‘मैदानी’चे नियोजन

Who is Sushila Karki? सुशीला कार्की नेपाळच्या प्रमुखपदी? भारतासाठी आनंदाची बातमी की नवी डोकेदुखी? संबंध कसे असतील?

Gokul Dudh Politics : गोकुळ दूध संघात सत्ता महायुतीची; वर्चस्व मात्र हसन मुश्रीफ- सतेज पाटील यांचेच, महाडिक -मंत्री मुश्रीफ यांच्यात नवा वाद...

SCROLL FOR NEXT