man killed teacher father mother and grandmother burnt bodies at home using sanitizer get government job  
देश

Crime News : बापरे! शिक्षक आई-वडील अन् आजीला संपवलं; घरातच सॅनिटायझर टाकून जाळले मृतदेह, कारण...

सकाळ डिजिटल टीम

पैशांच्या हव्यासासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. छत्तीसगढच्या महासमुंद जिल्ह्यात असाच थरकाप उडवून देणारा प्रकार घडला आहे. येथे एका व्यक्तीने पैसे आणि अनुकंपातत्वावर मिळणाऱ्या नोकरीसाठी स्वतःच्याच आई-वडिलांच्यी आणि आजीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इतकेच नाही तर या हत्येनंतर मृतदेह लाकूड आणि सॅनिटायझर वापरून तो दोन दिवस ते जाळत होता. यानंतर आई-वडिल हरवल्याची तक्रार देखील त्याने पोलीस ठाण्यात दिली. मात्र जेव्हा पोलीस चौकशी करण्यासाठी घरी गेले तेव्हा त्यांना घरात रक्ताचे डाग दिसले आणि प्रकरणाचा उलगडा झाला. (Latest Marathi News)

पोलीसांना जेव्हा घरात जळालेले मानवी अवशेषही सापडले तेव्हा पोलीसांनी मृतक दाम्पत्याचा मुलगा उदित याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आई-वडील आणि आजीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात कलव ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महासमुंद जिल्ह्यातील सिघोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुटका गावातील आहे. शिक्षक प्रभात भोई हे पत्नी सुलोचना भोई आणि ७५ वर्षीय झरना भोई हे एकत्र राहात होते.

प्रभात यांचा मुलागा उदित देखील त्यांच्यासोबत राहायचा. तो रायपूर येथे एमबीबीएस करत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितनुसार उदित नशेच्या आहारी गेलेला आहे. तसेच पैशांसाठी तो त्याच्या आई वडीलांशी सतत भांडत असे. (Crime News)

नेमकं झालं काय?

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे रोजी शिक्षक प्रभात भोई आणि त्यांचा मुलगा उदित यांच्यात पैशांवरून भांडण झालं. त्याच दिवशी त्याने वडीलांच्या हत्येचा कट रचला.

जेव्हा सर्वजण झोपले तेव्हा रात्री २ ते ३ च्या दरम्यान त्याने हॉकी स्टिकने वडीलांवर हल्ला केला.त्यानंतर आई सुलोचना यांची देखील हत्या केली.

याच आवाजाने उदितची आजी झोपेतून उठली त्याने त्यांच्या डोक्यात देखील हॉकी स्टिकने वार करत त्यांची देखील हत्या केली.

तिघांच्या हत्येनंतर त्यांने मृतदेह बाथरूममध्ये ठेवले. याच्या दुसऱ्या दिवशी घराच्या मागे त्याने तीन्ही मृतदेह सॅनिटायझर टाकून जाळून टाकले.तसेच त्याने १२ मे रोजी तीघे देखील हरवल्याची तक्रार दाखल केली.

पोलीसांनी गावातील नागरिकांची चौकशी केली असता त्यांनी दोन दिव घरातून धूर येत होता असं सांगितलं. तसचे उदित लोकांना अनुकंपा नियुक्ती कशी होते याबद्दल देखील चौकशी करत होता. दरम्यान पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT