termites eat money 
देश

लईचं वाईट! घर बांधण्यासाठी ट्रंकमध्ये साठवले पैसै; आयुष्यभराच्या कमाईला वाळवी

सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : तुम्ही देखील आपले महत्कष्टाने कमावलेले पैसे डब्यात, ट्रंकमध्ये, गादीखाली सुरक्षित ठेवता का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आंध्र प्रदेशातील एका व्यक्तीने आपली आयुष्यभराची कमाई बँकेत न ठेवता एका ट्रंकमध्ये सुरक्षित ठेवली होती. मात्र, असं करणं त्याला आता महागात पडलं आहे. जवळपास पाच लाख रुपयांची ही रक्कम त्याने आयुष्यभर पै-पै जोडत जमवली होती. मात्र, प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशांसोबत असं काही घडलं की त्याला आता त्याचा पश्चात्ताप होत आहे. 

कारण, ज्या ट्रंकमध्ये त्याने हे पैसे सुरक्षित राहतील म्हणून ठेवले होते, तो ट्रंक काही दिवसांनी उघडल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन नक्कीच हादरली असणार. कारण त्याने ट्रंक उघडून पाहिलं की, त्या ट्रंकमधील आयुष्यभराची कमाई असणाऱ्या सगळ्या नोटांना वाळवी लागली होती. या वाळवीने त्याच्या साऱ्या कमाईला खाऊन टाकलं होतं. आपलं स्वत:चं असं एक टुमदार घर बांधण्यासाठी त्याने हे पैसे साठवले होते. 

बिजली जमालया असं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे. त्यांचं वय 52 वर्षे आहे. त्याने 100, 500 आणि 2000 च्या नोटा एका ट्रंकमध्ये जपून ठेवल्या होत्या. हे पैसे त्याने मोठ्या कष्टाने कमावले होते. बिजली जमालया हे डुक्कर पालनाचं काम करतात. हातावरचं पोट असणाऱ्या या गरीब बिजलीला वाळवी लागलेले पैसे पाहून अतिव दु:ख झालं असेल यात शंका नाही. त्याच्या उद्योगात काही पैशांची गरज भासली होती. जवळपास 1 लाख रुपये त्याला गरजेचे होते म्हणून त्याने आपल्या साठवलेल्या पैशांतून पैसे काढण्याचा निर्णय घेतला. त्याने आपला ट्रंक उघडला आणि मग त्याला तो अनर्थ दिसून आला. जेंव्हा त्याने हे मातीमोल हे झालेल्या पैशांचे दृश्य पाहिलं तेंव्हा तो जमिनीवर कोसळून धाय मोकलून रडू लागला. त्याच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : एल्फिन्स्टन पुलासाठी २६ तासांचे सहा मेगाब्लॉक; पहिला ब्लॉक काही तासांत, पाच पॅनल टप्प्याटप्प्याने काढणार

Pune Crime : देवदर्शनावेळी ओळख, फिरायला नेत ठेवले संबंध; ब्लॅकमेल करत २ लाखांची मागणी, तोतया महिला वकिलाला अटक

विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार सेवा, ‘आदर्श शाळा’ योजनेत राज्यात ४०५ शाळा विकसित करण्यास मंजुरी

Share Market Closed: 31 मार्चला शेअर बाजार बंद? ट्रेडिंग होणार की नाही? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Latest Marathi News Live Update : पुण्याला अवकाळीचा तडाखा, ३ तासात १४ ठिकाणी पडली झाडे

SCROLL FOR NEXT