man committed to suicide in ambazari of nagpur 
देश

'प्रामाणिक व्यक्तीला न्याय मिळत नाही'; तरुणाची आत्महत्या

कार्तिक पुजारी

'देशातील कायदा-व्यवस्था आणि भ्रष्टाचारामुळे त्रासलो आहे. येथे प्रामाणिक व्यक्तीसाठी काहीही न्याय नाही

लखनऊ- 'देशातील कायदा-व्यवस्था आणि भ्रष्टाचारामुळे त्रासलो आहे. येथे प्रामाणिक व्यक्तीसाठी काहीही न्याय नाही. माझ्या मृत्यूसाठी स्टेशन प्रभारी, माझे शेजारी आणि माझे दोन काका जबाबदार आहेत. यांनी माझ्या कुटुंबियांसोबत धोका केला आहे. आज मी मरत आहे, याला जबाबदार हे सर्व लोक आहेत.' असा व्हिडिओ रिकॉर्ड करत अयोध्येतील एका युवकाने रेल्वे ट्रॅकखाली येऊन जीव दिला आहे. (man suicide at ayodhya after rocording video)

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने रिकॉर्ड केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये कायदा-व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सत्य जाणून घेण्यासाठी पोलिस अधीक्षक ग्रामीण पूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रकरण सुलतानपूर गल्लीतला आहे. स्थानिक रहिवासी असलेला तरुण अमित मौर्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी बेनीगंज रेल्वे क्रॉसिंगच्या रुळावर मिळाला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होत गेला. युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर आपल्या मरणाचं कारण सांगितलंय. त्याने रेल्वे रुळावर जाऊन एक व्हीडिओ केला. व्हिडिओमध्ये त्याने कायदा-व्यवस्था यासह इतर मुद्द्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. युवकाच्या आत्महत्येमुळे आणि त्याच्या व्हिडिओमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेश कुमार पांडेय यांनी सांगितलं की, युवकाच्या आत्महत्येमागे जमीनसंबंधी वाद असल्याचं समोर आलं आहे. प्रकरण सिटी मॅजिस्ट्रेट न्यायालयात प्रलंबित आहे. एसपी ग्रामीण शैलेंद्र कुमार सिंह या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितलं की, रिपोर्ट मिळाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. दरम्यान, युवकाच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरणही तापलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : अनंत अंबानी यांनी छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामला भेट दिली

Aashadhi Wari: आषाढी वारीसाठी आळंदी सज्ज! दोन दिवसांत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश; वारीपूर्व तयारीला अंतिम वेग

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT