Man Throw Boiling oil on wife bengaluru e sakal
देश

धक्कादायक! पतीनं पत्नीसह स्वतःच्या मुलीवर फेकलं उकळतं तेल

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : एका ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीवर काठीने हल्ला केला. इतकेच नाहीतर तिच्यावर उकळते तेल फेकले. लहान मुलगी आपल्या आईच्या बचावासाठी पुढे आली, तर नराधमाने तिलाही सोडले नाही. बंगळुरूमध्ये (Bengaluru) ही धक्कादायक घटना घडली आहे.

बंगळुरूच्या अडुगोडीजवळील एलआर नगरमध्ये हे जोडपं राहतंय. पती थॉमसने आपल्या पत्नीला सांगितले की तो पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाकघरात जात आहे. पण, त्याने पाण्याऐवजी भांड्यात तेल गरम केले. त्यानंतर लाकडी काठी घेऊन अँथोनीअम्मा बसली होती त्याठिकाणी गेला. तिला लाकडी काठीने मारहाण केली. त्यातच ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तो किचनमध्ये गेला आणि उकळते तेल तिला जीवंत मारण्याच्या हेतून तिच्या अंगावर फेकले. त्यामुळे महिला जोराने किंचाळली. आईच्या ओरडण्याचा आवाज ऐकून १३ वर्षीय मुलगी झोपेतून जागी झाली. वडील मुलीसोबत काय करत आहेत हे तिने पाहिले आणि आईला वाचवण्यासाठी पुढे गेली. तर नराधम बापाने कसलाही विचार न करता मुलीच्या अंगावरही तेल फेकले. आई आणि मुलीच्या ओरडण्यामुळे शेजारी धावत आले. त्यानंतर त्यांनी आरोपीला घराबाहेर काढले. त्यानंतर दोघी माय-लेकींना रुग्णालाय हलवण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT