Security forces during an anti-Maoist operation that led to the killing of top Maoist leader Ganesh Uike, who carried a reward exceeding ₹1 crore.

 

esakal

देश

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार!

One Crore Reward Maoist Eliminated by Security Forces : जवानांनी एका रिव्हॉल्व्हरसह रायफल आणि एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला.

Mayur Ratnaparkhe

Maoist Leader Ganesh Uike Killed in Encounter : ओडाशामधील बेलघर पोलिस स्टेशन परिसरातील गुम्मा जंगलात बुधवारी रात्री उशिरा सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. कंधमाल जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन महिलांसह सहा माओवादी ठार झाल्याचे पोलिसांनी वृत्त दिले आहे. शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात ओडिशाचे डीजीपी वाय.बी. खुराणा यांच्यासमोर २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही चकमक घडली.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ठार झालेल्या माओवाद्यांपैकी एकाची ओळख गणेश उईके अशी झाली आहे.  जो ओडिशाचा एक प्रमुख माओवादी नेता होता आणि ज्याच्यावर तब्बल १.१ कोटी रुपयांचे बक्षीस होते.

त्यांनी सांगितले की, दोन महिला माओवाद्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी चकमकीच्या ठिकाणाजवळ सापडले आहेत, ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तर, ओडिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) च्या एका लहान मोबाईल टीमने माओवाद्यांशी सामना करत जंगलात शोध मोहीम सुरू केली.

त्यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला आणि माओवादी ठार झाले. दोन पुरूष नक्षलवाद्यांचे मृतदेह ताबडतोब सापडले, तर काही अंतरावर आणखी एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी एक रिव्हॉल्व्हर, एक .303 रायफल आणि एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला. तर चकमकीत सुरक्षा दलांच्या बाजूची कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

Ajit Pawar: धनंजय मुंडेंना पुन्हा संधी! राष्ट्रवादीची यादी जाहीर; नेत्यांची संपूर्ण लिस्ट पाहा

Viral Video : वजन झेपलं नाही अन् बंजी जंपिंगची दोरी तुटली..खोल दरीत पडून शरीराचे अवयव झाले वेगळे; धक्कादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

31st December Party : अभी तो पार्टी शुरू हुई है..! बार, पब अन् क्लब मध्ये ‘New Year Celebration’ पहाटे पाच पर्यंत चालणार

Politics: मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात उलथापालथ; विधानसभा उपाध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण...

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी दोन पुरुषांना अटक

SCROLL FOR NEXT