marathi news belgaon international kite festival soon
marathi news belgaon international kite festival soon 
देश

बेळगावात लवकरच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - 20 जानेवारीपासून बेळगावात आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव होणार आहे. यासाठी 12 देशांमधील 22 जण, तर भारतातील सतरा पतंग उडवणारे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत, अशी माहिती माजी आमदार अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सावगाव रोडवरील अंगडी इन्स्टिट्यूटच्या परिसरात 20 ते 23 जानेवारी अखेर हा महोत्सव होणार आहे.

पतंग महोत्सवाचे हे आठवे वर्ष असून दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलांसाठी, मोठ्यांसाठी विविध कार्यक्रम होणार आहेत. 18 जानेवारीला मिडि सेंटरचे उद्घाटन होणार आहे. 20 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता पतंग महोत्सवाचे उद्घाटन होणार असून सायंकाळी पाच वाजता चिल्ड्रन्स फेस्टीव्हलचे व सात वाजता डीजे शो होणार आहे. 21 जानेवारीला खास तरुणाईसाठी उमंगचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांसाठी खास पतंग महोत्सव व फुगे उडविण्याची स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.

23 जानेवारीला क्रॅकर शो होणार असून विविध स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना पतंग महोत्सवाचा आनंद घेता यावा तसेच बेळगावची बाजारपेठ वृद्धिंगत व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT