Switzerland Swiss Bank 
देश

स्विस बँकेतील भारतीय खातेदारांची तिसरी यादी जाहीर

स्वित्झर्लंडमधील वित्त संस्थांमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि कंपन्यांची खाती असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ः देशातील काळ्या पैशासंबंधी भारत व स्वित्झर्लंडमधील करारातील माहितीच्या आदान-प्रदानाच्या नव्या कलमानुसार स्विस बँकांमधील (Switzerland Swiss Bank) भारतीयांच्या खात्यांची तिसरी यादी (Third list of Indian account holders) स्वित्झर्लंडसरकारने केंद्र सरकारकडे सोपविली आहे. सुमारे ९६ देशांना ३३ लाख आर्थिक खात्यांची माहिती पुरविली असल्याचा दावा स्वित्झर्लंडने केला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे.

स्वित्झर्लंडच्या सांघिक कर प्रशासनाने (एफटीए) माहितीच्या आदान-प्रदानाच्या जागतिक मानकांवर आधारित तेथील बँकेतील खात्यांची माहिती या वर्षी भारताला दिली आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये ‘एफटीए’ने ८६ देशांबरोबर ३१ लाख खात्यांची माहिती दिली होती. तर सप्टेंबर २०१९ मध्ये स्वित्झर्लंडने भारतासह ७५ देशांना माहिती पुरविली होती. ‘एफटीए’ने याबाबत सोमवारी सांगितले की, यंदा आणखी दहा देशांना माहितीचे देवाण-घेवाण केले आहे. यात अँटिग्वा आणि बर्ब्युडा, अझरबैझान, डॉमनिका, घाना, लेबनॉन, मकाऊ, पाकिस्तान, कतार, समोआ आणि वानुआतू या देशांचा समावेश आहे.

भारतीय नागरिक व कंपन्यांची स्विस खाती

स्वित्झर्लंडमधील ‘एफटीए’ने ज्‍या देशांना आर्थिक माहिती दिली आहे, त्या सर्व ९६ देशांची नावे व अन्य तपशील उघड केलेले नाहीत. मात्र भारताला सलग तिसऱ्या वर्षी स्विस खात्यांची माहिती दिली नसून स्वित्झर्लंडमधील वित्त संस्थांमध्ये अनेक भारतीय नागरिक आणि कंपन्यांची खाती असल्याची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली आहे, असा दावा ‘एफटीए’ने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT