Marathi News_Rahul Gandhi_Congress President_News Delhi
Marathi News_Rahul Gandhi_Congress President_News Delhi 
देश

काँग्रेसची धुरा राहुल गांधींच्या हाती; अध्यक्षपदाची घोषणा

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली - राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील, अशी औपचारिक घोषणा आज काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राहुल हे पक्षाचे सहावे अध्यक्ष असतील. काँग्रेस अध्यक्षपदासंदर्भात काँग्रेसचे मुख्य निवडणुक अधिकारी मुल्लप्पली रामचंद्रन यांनी आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली. 'अध्यक्षपदासाठी 89 नामांकन प्रस्ताव प्राप्त झाले होते. राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज सुमारे 90 संचांमध्ये दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी हे फक्त एकच उमेदवार होते. ही निवडणूक निःपक्षपातीपणे पार पडली', असे रामचंद्रन यांनी सांगितले. 

गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधी यांच्या नावाची काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चर्चा होती. आज अखेर या चर्चेस पुर्णविराम लागला आहे. मात्र अध्यपदावर विराजमान झाल्यानंतर पक्षासाठी राहुल गांधी पहिला काय निर्णय घेतील याविषयी सगळीकडे उत्सुकता लागली आहे. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. पण राहुल गांधी शिवाय कुणीही अर्ज दाखल केला नव्हता. राहुल यांनी 4 डिसेंबरला (सोमवार) काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 16 डिसेंबरला राहुल गांधी काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते काँग्रेसचे अध्यक्षपद स्विकारतील. राहुल गांधी जानेवारी 2013 पासून पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT