marriage broke after 12 hours of taking seven rounds at up 
देश

प्रियकरांचा 12 तासात दोन वेळा विवाह अन् घटस्फोटसुद्धा...

वृत्तसंस्था

हमीरपूर (उत्तर प्रदेश): दोघांनी विवाहादरम्यान सात फेरे घेतले. घरी गेल्यानंतर कुटुंबियांमुळे घटस्फोट करायला लावला. परत प्रेम उफाळून आले परत विवाह केला. परत, कुटुंबियांनी गुन्हा दाखल करत घटस्फोट घ्यायला लावला. ही घटना 12 तासात घडली आहे.

संदीप आणि त्याची प्रेयसी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. कॉलेजदरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेत सात फेरे घेतले. विवाह केल्यानंतर दोघे घरी गेले. युवतीच्या घरचे आले आणि तिच्यावर दबाव टाकत गुन्हा दाखल केला. तत्काळ घटस्फोटासाठी अर्जही दाखल करत माहेरी नेले. पण, घरी गेल्यावर तिचे मन रमेना. कुटुंबियांचे लक्ष नसल्याचे पाहून पुन्हा संदीपच्या घरी आली. दोघांनी परत मंदिरामध्ये विवाह केला. युवतीचे कुटुंबिय पुन्हा संदीपच्या घरी आले. युवतीला सोबत घेऊन पोलिस चौकीत गेले. पुन्हा गुन्हा दाखल करून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यामुळे दोघांचा 12 तासांत दोन वेळा विवाह आणि दोन वेळा घटस्फोटासाठी अर्ज दाखल झाला आहे. यामुळे पोलिसही हैरान झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे. परंतु, कुटुंबियांमुळे हा प्रकार घडला आहे. दोन्ही कुटुंबियांना समजावण्याचे काम सुरू आहे. सध्या तरी दोघेही आपापल्या घरी राहात आहेत. दरम्यान, प्रेयसीच्या त्रासाला आताच कंटाळलो आहे, काय करावे कळत नसल्याची प्रतिक्रिया प्रियकराने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात पडली अभिनेत्री, लिव्ह इन पार्टनरला संपवलं; १२ दिवस घरात सडला मृतदेह, तिघांना अटक

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

SCROLL FOR NEXT