masks with face of Narendra Modi are very popular at madhya pradesh 
देश

नरेंद्र मोदी मास्क वापरा अन् कोरोनाला पळवा...

वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश) : कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी मास्क वापरला जातो. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आले असून, नरेंद्र मोदी मास्क वापरा आणि कोरोनाला पळवा, असे विक्रेत्यांनी विक्रीमागचा फंडा सांगितला.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात मास्कची मागणी वाढली असून, राज्यातील कपडा व्यावसायिकांनी याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मास्क बाजारात आणला आहे. या मास्कला लोकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मोदींच्या मास्कसोबतच मास्क खरेदी करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, कमलनाथ यांचे पर्याय देखील बाजारात उपलब्ध आहेत.

एका विक्रेत्याने सांगितले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा मास्कही नागरिकांची पसंती आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्याकडे राहुल गांधी, कमलनाथ यांच्या चेहऱ्याचे मास्कही ठेवले आहेत. पण यासर्वात जास्त मागणी मोदींच्या मास्कला आहे.'

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगसोबत मास्क वापरणेही अनिवार्य असल्याचे वारंवार सांगितले जाते. कोरोनाचा फटका मध्य प्रदेशलाही बसला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 11 हजार रुग्ण सापडले असून, 465 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

Sikkim Tourism: सिक्कीममधील गुरुडोंगमार सरोवर पुन्हा खुले, पण नियम मोडल्यास प्रवास रद्द!

Satara News: साताऱ्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची परवड; गॅसटंचाईमुळे खाणावळी बंद, विद्यार्थी गावी परतल्याने अभ्यासिका ओस

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स सहावे जेतेपद पटकावणार का? एक गोष्ट जी वाढवू शकते टेंशन, जाणून घ्या त्यांची बेस्ट Playing XI

Pune News: पुण्यातील बुधवार पेठेतील पोलिसांची अल्पवयीन मुलींवरील कारवाई बेकायदेशीर; तथ्यशोध समितीचा आरोप, बालहक्कांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT