Vaishno-Devi 
देश

Corona Effect : वैष्णोदेवी यात्रेबाबत जम्मू-काश्मीर सरकारचा मोठा निर्णय!

जावेद मात्झी

श्रीनगर : देशात कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेता प्रसिद्ध माता वैष्णोदेवीची यात्रा आजपासून स्थगित करण्यात आली आहे. जम्मू काश्‍मीर सरकारने श्री माता वैष्णोदेवी यात्रा तातडीने थांबविण्याचा निर्णय आज जाहीर केला. यासंदर्भात श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने आदेश जारी केले. त्यानंतर दुपारी दोननंतर यात्रेचे नोंदणी केंद्र बंद केले आहे. 

आज दुपारी अचानक नोंदणी केंद्र बंद केल्याने परराज्यातून आलेल्या भाविकांचा हिरमोड झाला. अर्थात पहाटे पाचपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुमारे ८५०० भाविकांनी नोंदणी केली आहे. ज्या भाविकांची नोंदणी झाली आहे, ते दर्शन घेऊ शकतात, असे देवस्थानने स्पष्ट केले. देवस्थान मंडळाने कटरा येथील नोंदणी केंद्र बंद करण्याबरोबरच ऑनलाइन सेवाही तूर्त स्थगित केली आहे.

यात्रा पुन्हा सुरू करण्याचे आदेश येईपर्यंत ऑनलाइन सेवा बंद राहणार आहे. तत्पूर्वी कोरोना संसर्गाचे वातावरण पाहता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने देशातील भाविकांना यात्रा स्थगित करण्याचे आवाहन केले होते. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत यात्रेला येऊ नये, अशी सूचना काल देवस्थानने दिली होती. 

आंतरराज्यीय बससेवा बंद 

जम्मू-काश्‍मीर परिवहन महामंडळाची बससेवादेखील आजपासून बंद करण्यात आली आहे. राज्यातील राज्यात आणि राज्याबाहेरील बससेवेवर बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी राज्यात सुमारे २० पोलिस उपअधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश गृहविभागाने काढले आहेत.

संशयित रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे विलगीकरण करणे याकामी हे अधिकारी प्रशासनाला मदत करणार आहेत. हे अधिकारी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या वतीने तयार केलेल्या नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी उपलब्ध असतील, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT