adityanath and mayawati 
देश

जिल्हाधिकाऱ्यांबाबत यूपी सरकार गप्प का? मायावती यांचा आदित्यनाथ यांना प्रश्‍न

पीटीआय

लखनौ - ‘हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत उत्तर प्रदेश सरकार गप्प का?’’ असा प्रश्‍न बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उपस्थित केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशात राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारला या मुद्यावरून धारेवर धरले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता बहुजन पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

‘हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांवर धमकी देण्यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. तरी देखील उत्तर प्रदेश सरकारचे रहस्यमयरीत्या गप्प राहणे अतिशय दुःखद व चिंताजनक आहे. सरकार या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी करण्यासाठी तयार झाले आहे, मात्र ते जिल्हाधिकारी तिथे असताना या प्रकरणी निष्पक्ष चौकशी कशी काय होऊ शकते? याबाबत लोक साशंक आहेत,’’ असे  मायावती यांनी म्हटले आहे. मायावती यांनी ‘ट्विट’ करून आपले प्रश्‍न सर्वांसमोर मांडले आहेत.

यापूर्वी, ‘हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर संपूर्ण देशात आक्रोश आहे. सुरूवातीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीतून लोकं समाधानी नाहीत,’ असे म्हणत या घटनेची सीबीआयतर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी मायावती यांनी केली होती.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT