rape case  file photo
देश

ट्रिपल तलाक: निकाह हलाला प्रथेच्या नावाखाली महिलेवर सामूहिक बलात्कार

महिलेला पहिल्या पतीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. पण त्याआधी ही घटना घडली.

दीनानाथ परब

मुंबई: ट्रिपल तलाक दिल्यानंतर (triple talaq case) नवऱ्यासोबत पुन्हा निकाह करण्यास इच्छुक असलेल्या महिलेबरोबर निकाह हलाला (nikah halala) प्रथेच्या नावाखाली सामूहिक बलात्कार (rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत महिला उत्तर प्रदेश मेरठ (Meerut) येथे राहणारी आहे. आता कायद्याने ट्रिपल तलाक बेकायद ठरतो. सहा महिन्यापूर्वी पीडीत महिलेच्या नवऱ्याने तीनवेळा तलाक शब्दाचा उच्चार करुन तिला ट्रिपल तलाक दिला होता. नतंर पीडीतेच्या नवऱ्याला आपल्या कृत्याची खंत वाटली व त्याने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

तिने या बद्दल मौलवीचा सल्ला घेतला, तेव्हा त्यांनी निकाह हलाला प्रथेचे पालन करुन पहिल्या नवऱ्यासोबत निकाह करण्याचा सल्ला दिला. ट्रिपल तलाक दिलेल्या पतीसोबत पुन्हा संसार थाटायचा असेल, तर निकाह हलाला प्रथेला सामोर जावं लागतं. या प्रथेमध्ये महिलेला दुसऱ्या व्यक्तीसोबत आधी निकाह करावा लागतो.

विवाहाचे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर पुन्हा घटस्फोट घ्यावा लागतो. त्यानंतरच तिला पहिल्या पतीसोबत निकाह करता येतो. मेरठ मध्ये राहणाऱ्या पीडीत महिलेला रियासत नावाच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यात सांगण्यात आले. रविवारी मौलवीने महिला आणि रियासत दोघांना टीपी नगर भागातील हॉटेलमध्ये बोलावले. तिथे मौलवी त्यांचा निकाह करणार होता.

रियासतने त्या हॉटेलमध्ये आपल्या एका मित्रालाही बोलावले. दोघांनी मिळून पीडित महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर महिलेने तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराबाबत भावाला सांगितले. त्याने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मौलवीचा शोध सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT