Matru Siri Foundation
देश

सलाम! कोविड रुग्णांच्या घरी जाऊन ते करतात उपचार

सकाळी ८ वाजल्यापासून त्यांची कोविड रुग्णांना भेटण्याची वेळ सुरु होते.

शर्वरी जोशी

कोरोनाचा (coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. सोबतच डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीदेखील अहोरात्र रुग्णांसाठी काम करत आहेत. यामध्येच सध्या चर्चा रंगली आहे ती बंगळुरुमधील (bengaluru) डॉ. सुनील कुमार हेबी यांची. गेल्या कित्येक महिन्यांपासून ते स्वत: कोविड रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करत आहेत. (meet-the-doctor-from-bengaluru-treats-covid-patients-at-their-home)

कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने अनेक जण कोविड रुग्णांपासून दूर पळत आहेत. तर, डॉक्टर किंवा इतरेतर कर्मचारीदेखील कोविड रुग्णांची सेवा करतांना संरक्षणाची पुरेपूर काळजी घेत आहेत. मात्र, यामध्ये डॉ. सुनील कुमार हेबी हे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत थेट कोविड रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची सेवा करत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून त्यांची कोविड रुग्णांना भेटण्याची वेळ सुरु होते.

"ज्या रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे आहेत त्या रुग्णांची मी सेवा करतो. प्रथम फोनवर मी रुग्णांचं मार्गदर्शन करतो. या काळात कोणती काळजी घ्यावी हे सांगतो. परंतु, त्यानंतरही रुग्णामध्ये फरक पडत नसेल तर मी त्या रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार करतो", असं डॉ. हेबी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "काही दिवसांपूर्वी माझ्या पुतण्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मी हे मोबाईल क्लिनिक सोडून द्यावं असं माझ्या कुटुंबियांचं मत आहे. कारण, ज्या दिवशी माझ्या पुतण्याचं निधन झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशीही मला कामावर जावं लागलं होतं."

डॉ. हेबी यांचं आहे मोबाईल क्लिनिक

'न्यू इंडियन एक्स्प्रेस'नुसार, ३७ वर्षीय सुनील हेबी यांचं मोबाईल क्लिनिक आहे. गेल्या १० वर्षांपासून ते हे क्लिनिक चालवतात. मातृसिरी फाऊंडेशन असं त्यांच्या संस्थेचं नाव असून या संस्थेअंतर्गत ते गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात.

कोविड काळात कामाचा वाढला भार

डॉ. हेबी सकाळी मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करतात.सोबतच आता त्यांनी कामाचे तास वाढवून ते नाईट शिफ्टमध्येही काम करु लागले आहेत.

सध्याच्या काळात डॉ. हेबी दिवसाबरोबरच नाईट शिफ्टमध्येही काम करत आहेत. रात्रीच्या वेळी डॉ. हेबी बंगळुरू नगरपालिकेच्या कोविड सेंटर गोरीपाल्या येथे ड्यूटी करतात. तर दिवसा मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून कोविड व अन्य रुग्णांची सेवा करतात. विशेष म्हणजे दिवसरात्र मेहनत करुन त्यांना केवळ रात्री १ ते ३ या काळातच झोप मिळते.

डॉ. हेबी विजयपुरा येथील रहिवासी असून ते बीजीएस रुग्णालयात काम करत होते. त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देत मोबाईल क्लिनिक सुरु केलं. सोबतच ते असिस्टंट डॉक्टर म्हणूनही काम करतात.

त्यांचं कार्य पाहून लोकांनीही केली मदत

डॉ. हेबींची ही जनसेवा पाहून काही नागरिकांनी त्यांना २ लाख रुपयांची मदतही केली. या पैशामधून डॉ. हेबी यांनी रुग्णांसाठी त्यांच्या गाडीत ईसीजी मशीन, ऑक्सिजन कंसंट्रेटर आणि सिलेंडर बसवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT