अहमदनगर संतांची भूमी म्हणतात ते उगीच नाही. याच जिल्ह्यात मेहेराबाद म्हणून एक ठिकाण आहे. जिथे मेहेरबाबा यांची समाधी आहे. या समाधीवर डोकं टेकवायला परदेशातील लोक हजेरी लावतात. याच मेहेरबाबांसाठी हॉलिवूडमध्ये रिसेप्शन ठेवलं गेलं होतं.
मेहेरबाबांवर टाईम्स या प्रतिष्ठीत मॅगझिनमध्ये लेखही छापून आला होता. पण हे बाबा नक्की कोण त्यांचे कार्य काय याबद्दल फार कमी भारतीयांना माहिती आहे. त्याबद्दलच आज जाणून घेऊयात.
मेहेरबाबा यांचा जन्म पुण्याचा. मूळनाव मेरवान शेरियार इराणी. त्यांचे वडील इराण हून भारतात आले. झोराष्ट्रीयन पारसी धर्माचे ते साधक होते. मेरवान हा त्यांचा दुसरा मुलगा. घरातल्या अध्यात्मिक वातावरणाचे त्यांच्यावर लहानपणापासून संस्कार झाले होते.
१९ वर्षाचे असताना मेहेरबाबा डेक्कन कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा कॉलेजच्या वाटेवर त्यांना एक आजी दिसायची. तिच्यासोबत ते बसू लागले, गप्पा मारू लागले. त्या आजीकडे असलेल्या दैवी शक्तीमूळेच ते आध्यात्माकडे खेचले गेले, असे सांगितले जाते.
त्यानंतर ते आध्यात्माच्या ओढीने बाहेर पडले. त्यांच्या प्रवासात त्यांना ताजुद्दीन बाबा, नारायण महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि उपासनी महाराज हे चार सद्गुरू त्याला सापडले. यातील उपासनी बाबा यांच्या सोबत ते सात वर्षे राहिले.
मेहेर बाबा यांचे मूळ नाव मेरवान शेरियार इराणी असे होते. मेहरबाबा जगभर फिरले. पण त्यांनी अहमदनगरची भूमी निवडली. नगरजवळील वांबोरी रोडवरील पिपळगाव माळवी येथील आश्रमात राहत असत.
मेहेरबाबा समाधी अरणगाव येथे मेहेरबाद येथे आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कॉलेजनंतर ते अध्यात्मिक क्षेत्राकडे वळले.
१० जुलै १९२५ रोजी त्यांनी वयाच्या २९व्या वर्षी मौन व्रत धरण केले होते. अशातच १९३१ मध्ये त्यांनी परदेशवारी केली. त्यावेळी हॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या भेटी झाल्या. मेहेरबाबा यांच जंगी स्वागतही करण्यात आलं. तेव्हा टाईम्स मॅगझिनमध्येही त्यांच्यावर लेख छापून आला आणि जगभर त्यांची किर्ती पसरली.
लेख आल्यानंतर त्यांचा महिमा अनेक लोकांनी मान्य केले. बाबांसोबत राहण्यासाठी भारतात येण्याचे अनेक अमेरिकन नागरिकांनी ठरवलं.
जुलै १९२५ मध्ये धारण केलेल्या मौन नुसार मेहेर बाबा हे आपल्या जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत शांत राहिले आणि ३१ जानेवारी १९६९ रोजी या महान गूढवादी आणि अध्यात्मिक गुरुचे निधन झाले.
तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा आजही सुरू आहे. आजही अनेक परदेशी भाविक बाबांच्या या समाधीवर डोकं टेकवतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.