jaggery 
देश

शेतकरी विकतो 57 प्रकारचे गुळ; किंमत मिळते तब्बल 5 हजार रुपये किलो

सकाळ डिजिटल टीम

मेरठ - कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे सध्या शेतकरी चर्चेच आहेत. दरम्यान, आता उत्तर प्रदेशातील एक शेतकरी त्याने तयार केलेल्या गुळामुळे चर्चेचा विषय बनला आहे. मेरठमध्ये सरदार वल्लभ भाई पटेल कृषी विद्यापीठात प्रदर्शन भरले आहे. याठिकाणी शेतकऱ्याने आणलेल्या गुळाची किंमत नेहमच्या गुळापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. 

सहारनपूर इथं राहणाऱ्या संजय सैनी या शेतकऱ्याने एक दोन नव्हे तर तब्बल सत्तावन प्रकारचा गुळ तयार केला आहे. इतकंच नाही तर यात एक असाही गुळ आहे ज्याची किंमत बाजारात पाच हजार रुपये प्रति किलो इतकी आहे. संजय यांनी या गुळामुळे तब्येत ठणठणीत राहते असं सांगितलं आहे. 

संजय यांनी म्हटलं की, जर आपण मेथीचा गुळ वापरला तर आर्थेराइटिस होणार नाही. याशिवाय धने मिश्रित गुळाच्या वापरामुळे पित्ताचा त्रास कमी होईल. तसंच इतरही काही गुळाचे प्रकार असून याच्या औषधी गुणधर्मामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. 

सुगंधा स्वर्णभस्म असलेला गुळ संजय यांनी तयार केला आहे. स्वर्णभस्माच्या या गुळाची किंमत पाच हजार रुपये प्रतिकिलो इतकी आहे. हींग आणि इतर औषधी वनस्पती असलेला गुळसुद्धा त्यांनी तयार केले आहेत. यात ड्रायफूट असलेल्या गुळाची विक्री जास्त होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

संजय सैनी यांच्याकडे गुळाची मागणी वाढली असून राज्याबाहेरूनही ऑर्डर येत आहेत. त्यांनी सांगितलं की, आता सहज भेटल्यावरही लोक गुळाची ऑर्डर देत असून अपेक्षेहून अधिक प्रतिसाद लोकांनी या गुळाला दिला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: मुंबईत राजकीय भूकंप! बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात काँग्रेसची मोठी खेळी; मविआची एकजूट ढासळली

India's T20 WC 2026 Schedule : संघ जाहीर झाला आता भारताचं वेळापत्रक नोट करा! पहिला सामना अमेरिकेशी नंतर पाकिस्तानशी भिडणार...

Latest Marathi News Live Update: मुंबई पालिकेतील मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून राजकीय वाद पुन्हा चिघळला!

Dhule News : धुळे राष्ट्रवादीचे जहाज 'विना कॅप्टन'; शहराध्यक्षाविना निवडणुकीच्या रिंगणात कशी टिकणार फौज?

Jaysingpur Farmer : ऊसपट्ट्यातच चाऱ्याचा दुष्काळ; शिरोळमध्ये वाड्यासाठी शेकड्याला २०० रुपये

SCROLL FOR NEXT