Asani Cyclone esakal
देश

'असनी' चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागराला बसणार फटका?

सकाळ डिजिटल टीम

या चक्रीवादळामुळं बंगाल उपसागर व दक्षिण अंदमान समुद्रात हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात पुढील आठवड्यात 'असनी चक्रीवादळ' (Asani Cyclone) घोंघावू शकतं. हवामान विभागानं (IMD) म्हटलंय की, नैऋत्य हिंदी महासागरावरील कमी दाबाचं क्षेत्र पुढील आठवड्याच्या सुरुवातीला चक्री वादळात बदलू शकतं. हे चक्रीवादळ नंतर बांगलादेश आणि लगतच्या उत्तर म्यानमारकडं सरकणार आहे. सध्या कमी दाबाचं क्षेत्र (LPA) मंगळवारी तयार झालं असून शनिवारपर्यंत ते पूर्व-वायव्य दिशेनं सरकण्याची शक्यता आहे. यानंतर हे वादळ अंदमान आणि निकोबार बेटांकडं (Andaman and Nicobar Islands) जाईल, असं IMD नं नमूद केलंय.

हवामान खात्यानं (Meteorological Department) सांगितलं की, सध्या तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र 21 मार्च रोजी चक्री वादळात बदलण्याची दाट शक्यता आहे, तर 22 मार्च रोजी हे वादळ उत्तर आणि ईशान्येकडं सरकेल. जर या चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं, तर त्याचं नाव 'असनी' असेल. नियमांनुसार, या चक्री वादळाला श्रीलंकेनं 'असनी' असं नाव दिलंय. उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशांना प्रभाव दाखवल्यानंतर हे चक्रीवादळ 23 मार्च रोजी बांगलादेश (Bangladesh) आणि म्यानमारच्या (Myanmar) उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचेल.

हवामान खात्यानुसार, गुरुवार आणि शुक्रवारी आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या दक्षिण अंदमान समुद्रात हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय. येत्या बुधवारी बंगालचा दक्षिणेकडील भाग आणि अंदमान समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा इशारा देण्यात आलाय. शनिवार ते मंगळवार दरम्यान अंदमान समुद्रातून अंदमान-निकोबार बेटांवर प्रवास न करण्याचा सल्लाही हवामान खात्यानं दिलाय. तसेच रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या दिवशी वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर असू शकतो, तर दुसऱ्या दिवशी ताशी 90 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, चक्रीवादळाचं वादळात रुपांतर झाल्यास ते किती धोकादायक ठरू शकतं, हे हवामान खात्यानं सांगितलेलं नाहीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT