Migrant Trains to West Bengal and Odisha Cancelled in View of Cyclone Amphan 
देश

मोठं संकट; पश्चिम बंगाल, ओडिशाकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असतानाच आणखी एक मोठं संकट देशावर आले आहे. देशाच्या पूर्व किनार पट्टीला 'अम्फान' या चक्रीवादळाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने मंगळवारी जाहीर केले की पश्चिम बंगाल आणि ओडिशासाठी तीन श्रमिक स्पेशल गाड्या २१ मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पुढील काही दिवसांत गाड्या पाठविण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मान्यता मिळाली आहे. दरम्यान,पश्चिम बंगालला एक रेल्वे आणि दोन गाड्या किनारपट्टी ओडिशासाठी पाठविण्याचे ठरविले गेले होते. परंतु, आम्हाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ 'अम्फान'च्या धोक्याची माहिती मिळाल्यानंतर या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
---------
लाईव्ह गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल; दोघांचा मृत्यू
---------
अमेरिकेपेक्षा भारताची स्थिती चांगली
--------
चक्रीवादळाच्या या धोक्यामुळे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. या सुपर सायक्लॉन अम्फान या वादळाचा धोका लक्षात घेऊन परप्रांतीय मजुरांना घेवून जाणाऱ्या श्रमिक रेल्वे सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. या श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून सुमारे चार लाख श्रमिकांना विविध राज्यात सुरक्षित पोहोचविण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये उद्भवलेल्या अम्फान या वादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.  ही बाब लक्षात घेऊन या राज्याकडे जाणाऱ्या मजुरांनी गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT