Asaduddin Owaisi esakal
देश

उत्तर प्रदेशनंतर MIM ची राजस्थानात एन्ट्री; ओवैसींचा पक्ष आजमावणार निवडणुकीत नशीब

सकाळ डिजिटल टीम

एमआयएमचा प्रवेश इतर राज्यांप्रमाणंच राजस्थानमध्येही काँग्रेससाठी आव्हान ठरू शकतो.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) नशीब आजमावल्यानंतर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) आता राजस्थानात एन्ट्री करत आहे. गेल्या 2 महिन्यांपासून राजस्थानमधील जनतेशी संवाद साधल्यानंतर, ओवैसींनी मंगळवारी जयपूर इथं पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कोअर कमिटीच्या स्थापनेची माहिती दिली. यात राज्यातील 6 लोकांचा समावेश असणार आहे.

एमआयएमनं राज्य पातळीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. त्याचवेळी ओवैसींनी राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्ष किती जागा लढवणार याबाबत भविष्यात घोषणा केली जाईल, असं सांगितलंय. तर, दुसरीकडं निवडणुकीसंदर्भात इतर राजकीय पक्षांसोबतच्या युतीबाबत ओवैसी म्हणाले, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता आमचं लक्ष संघटन मजबूत करण्यावर आहे, त्यानंतरच कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा विचार करू, असं त्यांनी नमूद केलंय.

राजस्थानमध्ये एआयएमआयएमचा प्रवेश इतर राज्यांप्रमाणंच राजस्थानमध्येही काँग्रेससाठी (Congress) आव्हान ठरू शकतो, असं सांगण्यात येतंय. ओवैसींच्या प्रवेशामुळं काँग्रेसच्या पारंपरिक व्होटबँकेला हादरा बसू शकतो, अशा स्थितीत राज्यातील सुमारे 40 विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसची पाळेमुळं हादरून गेल्यानं अनेक दिग्गज नेत्यांवर निवडणुकीत संकट येऊ शकतं, असंही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

निवडणुकीबाबत ओवैसी म्हणाले, 'राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Election) आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार आहोत. मात्र, त्यांनी जागांच्या संख्येबाबत काहीही जाहीर केलं नाही. सध्या आम्ही राजस्थानमध्ये आमचं संघटन मजबूत करू, नंतर भविष्यात कोणत्याही पक्षाशी युती करण्याबाबत निर्णय घेऊ.' दरम्यान, राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या जातीय दंगलीवरून ओवैसींनी गेहलोत सरकारवर हल्लाबोल केला. राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचा सरकारचा दावा अत्यंत कमकुवत असल्याचं ओवैसींनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT