मुंबई : एकीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून देश कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीकोनातून वाटचाल करत आहे. महाराष्ट्रातील रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई, ठाणे आणि पुणे येथील आहेत. सव्वा लाखांहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील असून आतापर्यंत 90 हजार 911 जण घरी पोहचले आहेत.
राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 52.2 टक्के एवढे झाले आहे, दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील रुग्णांनी 5 हजारांचा आकडा पार केला. त्यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्रासह देशाच्या आकडेवारीत ही भर पडत आहे.
ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर
देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 66 हजार 840 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, यातून बरे झालेल्या रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 60 टक्क्यांवर पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातून ही माहिती समोर आली आहे.
आतापर्यंत देशात असणार्या 5 लाख 66 हजार 840 रुग्णांपैकी 3 लाख 35 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील असून ही संख्या जवळपास पावणे दोन लाखांच्या घरात आहे. मुंबईची विस्कटलेली घडी पुन्हा बसावी म्हणून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज आहे. मात्र, असे जरी असले तरी रुग्ण बरे होण्याच्या संख्येत ही वाढ झाली, ही एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.