Corona Vaccination esakal
देश

लशींचे डोस मिक्स केले जाणार? सरकारचे संसदेत उत्तर

कार्तिक पुजारी

देशात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. दररोज ४० हजारांच्या आजपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

Mixing Coronavirus Vaccine नई दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. दररोज ४० हजारांच्या आजपास कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. असे असले तरी सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी देशात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले आहे. दोन लशींचा डोस एकत्र करुन ती नागरिकांना देण्याची चर्चा देशात सुरु झाली होती. याबाबत सरकारने संसदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. (corona latest marathi news)

केंद्र सरकारने स्पष्ट केलंय की, कोरोना विषाणू प्रतिबंधक दोन लशींचा डोस मिक्स करण्याबाबत आतापर्यंत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती प्रविण पवार यांनी राज्यसभेत एका प्रश्नावर लिखित स्वरुपात याची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, कोरोना प्रतिबंधक लशी नुकत्याच विकसित झाल्या आहेत. विविध लशींचे डोस एकत्र करण्याचे वैज्ञानिक प्रमाण नाही, शिवाय यावर अभ्यास सुरुवातीच्या टप्प्यात आहे.

लसीकरणावरील राष्ट्रीय आरोग्य सल्लागार समुहाने आणि कोविड-१९ च्या लसीकरणावरील राष्ट्रीय तज्त्र गटाने लशीचे डोस मिक्स करण्याची शिफारस केली नाही, असं भारती पवार संसदेत म्हणाल्या. जागतिक आरोग्य संघटनेने आणि इतर कोणत्या तज्त्र गटाने लशींचा डोस मिक्स करण्याची शिफारस केलेली नाही. त्यामुळे तुर्तास याबाबत कसलाही विचार नसल्याचे भारती पवार स्पष्ट केले.

संसदेत विचारण्यात आलं होतं की, 'कोविड प्रतिबंक लशीचा पहिला आणि दुसरा डोस मिळवून गरजू लोकांना दिला जाऊ शकतो. याबाबत काही अभ्यास करण्यात आला आहे का? याबाबत काही वैज्ञानिक प्रमाण आहे का? यामुळे लोकांवर प्रतिकूल परिणाम पडतील का?' दरम्यान, देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन लशी मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लशींचा समावेश आहे. देशात आतापर्यंत जवळपास ४९ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

Pune Land Scam : निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा; १९ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण!

Drunk Police Officer : मद्यधुंद पोलिस अधिकाऱ्याने सहा जणांना उडवलं!, जमावाने बेदम चोपलं

Khelo India Games : जिद्दीच्या जोरावर पालीचा अनुज सरनाईक देशाच्या नकाशावर; नॅशनल बीच गेम्समध्ये महाराष्ट्राला 'सिल्व्हर' मेडल!

Akot BJP AMIM Alliance : "मीडियाने चिंधीचा साप केला"; एमआयएमसोबतच्या युतीवर आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तोडले मौन!

SCROLL FOR NEXT