vaccine
vaccine 
देश

मिक्स लसीच्या डोसमुळे ओमिक्रॉनचा धोका टळेल? एका स्टडीतून खुलासा

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाची दुसरी लाट (coronavirus second wave) ओसरल्यानंतर गोष्टी सामान्य वाटू लागल्या असतानाच ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटने (omicron) संपूर्ण जगासाठी समस्या वाढवल्या. जगभरात पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. अभ्यासांनी असे सुचवले आहे की कोरोनाचा हा नवीन प्रकार आतापर्यंतचा सर्वात सांसर्गिक असू शकतो, ज्यामुळे लोकांना प्रतिबंध करण्यासाठी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

मिक्स लसीच्या डोसमुळे ओमिक्रॉनचा धोका टळेल?

यावर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लसीचा तिसरा डोस देऊन लोकांचे त्यापासून संरक्षण केले जाऊ शकते.अशा परिस्थितीत, दोन वेगवेगळ्या ब्रँडच्या लसींचे मिश्रण डोस देऊन लोकांना ओमिक्रॉनच्या धोक्यापासून वाचवता येईल का? दुसऱ्या लाटेत मिक्स डोसबाबत बरीच चर्चा झाली. जाणून घेऊया याबद्दल.

मिक्स लसीकरण म्हणजे काय?

ओमिक्रॉनपासून संरक्षण करण्यासाठी, बूस्टर डोससह, लसींच्या मिश्रणावर चर्चा सुरू झाली आहे. मिक्स लसीकरण म्हणजे दोन वेगवेगळ्या ब्रँडच्या लसीचे दोन डोस देणे. सामान्यतः लोकांना एकाच कंपनीच्या लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जातो. काही युरोपीय देशांनीही चांगल्या परिणामकारकतेसाठी मिश्र लसीकरण देण्याचा निर्णय घेतला होता.

कोरोना आणि मृत्यू होण्याचा धोका कमी

ओमिक्रॉनवर मिश्रित डोसचे परिणाम अभ्यास दर्शविते की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना गंभीर कोरोना संसर्ग आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो. तथापि, ओमिक्रॉन प्रकारात 30 पेक्षा जास्त म्युटेशन असल्याने, लसीचे दोन डोस किती प्रभावी असू शकतात हे निर्धारित करण्यासाठी अभ्यास चालू आहेत. नवीन प्रकारात रोगप्रतिकारक शक्तीपासून बचाव करण्याची क्षमता आहे असे मानले जाते, म्हणून काही तज्ञांच्या मते दोन वेगवेगळ्या ब्रँडची लस दिल्याने शरीरात मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते.

अभ्यासात काय आढळले?

काही अभ्यासांमध्ये, मिश्रित लसीचा डोस अधिक प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) आणि युरोपियन सेंटर फॉर डिसीज प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल (ECDC) यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, वेक्टर आणि mRNA लसींचे संयोजन SARS-CoV-2 विषाणूविरूद्ध चांगले संरक्षण प्रदान करू शकते. एका अभ्यासानुसार, Oxford-AstraZeneca किंवा Pfizer-BioEntech च्या पहिल्या डोसनंतर नऊ आठवड्यांनी Novavax किंवा Moderna चा दुसरा डोस दिल्याने शरीरात मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT