Toor and Urad Dal Price Sakal
देश

Toor Dal Price: तूर आणि उडीद डाळींच्या वाढत्या किंमतीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय, लोकांना होणार...

काही दिवसांपासून डाळींच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

राहुल शेळके

Toor and Urad Dal Price: काही दिवसांपासून डाळींच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. विशेषत: तूर आणि उडीद डाळींचे भाव वाढत आहेत. आता डाळींच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. याचा सर्वसामान्यांना फायदा होईल, अशी आशा केंद्र सरकारला आहे.

केंद्र सरकारने शुक्रवारीच घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि आयातदाराकडे ठेवलेल्या तूर आणि उडीद डाळीवर ऑक्टोबरपर्यंत साठ्याला मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे तूर आणि उडीद डाळींचे भाव घसरतील किंवा भाव स्थिर राहू शकतात.

तूर आणि उडीद डाळींचे भाव किती वाढले आहेत?

या संदर्भातील आदेश केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने साठ्याला आळा घालण्यासाठी आदेश दिले आहेत.

शुक्रवारी तूर डाळींची सरासरी किरकोळ किंमत 19 टक्क्यांनी वाढून 122.68 रुपये प्रति किलो झाली, जी एका वर्षापूर्वी 103.25 रुपये प्रति किलो होती.

दुसरीकडे, उडीद दाळीची सरासरी किरकोळ किंमत 5.26 टक्क्यांनी वाढून 105.05 रुपयांवरून 110.58 रुपये प्रति किलो झाली आहे.

किरकोळ विक्रेत्यांसाठी साठ्यावर मर्यादा:

पीटीआयच्या वृत्तानुसार, ग्राहक सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की तूर आणि उडीद दाळीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत साठ्यावर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या आदेशानुसार तूर आणि उडीद दाळीसाठी साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 200 टन, किरकोळ विक्रेते आणि किरकोळ दुकानदारांसाठी 5 टन आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये 200 टन ठेवण्यात आली आहे.

पोर्टलवर साठा लिमिट अपलोड करण्यास सांगितले आहे:

आयातदारांना सीमाशुल्क मंजुरीच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवण्याची परवानगी नाही. मंत्रालयाने ग्राहक व्यवहार विभागाला पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) साठा मर्यादेची स्थिती अपलोड करण्यास सांगितले आहे.

डाळींचे उत्पादन घटण्याचा अंदाज:

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, देशाचे तूर उत्पादन मागील वर्षीच्या 4.22 दशलक्ष टनांच्या तुलनेत 2022-23 जुलै-जूनमध्ये 3.43 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, उडदाचे उत्पादन 2.77 दशलक्ष टनांवरून 2.61 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT