rahul gandhi, narendra modi
rahul gandhi, narendra modi 
देश

मोदी है तो मुमकिन है। राहुल गांधींचा मोदींना टोला

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सरकारच्या आर्थिक धोरणावर सातत्याने टीका करत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मोदी है तो मुमकीन है! असं म्हणत त्यांनी देशातील अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत असल्याचे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय.

राहुल गांधी यांनी Infosys चे संस्थापक एन आर नारायणमूर्ती (N R Narayanmurthi) यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत मोदी सरकारवर तोफ डागली आहे.  'मोदी है तो मुमकिन है' असा उल्लेख करत त्यांनी नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याचा फोटो शेअर केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशातील अर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. सध्याच्या घडीला देशाची अर्थव्यवस्था स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या काळातील सर्वात निच्चांक पातळीवर जाईल, अशी भीती नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी लवकरात लवकर सक्षम पावले उचलण्याची गरज आहे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे. 

यंदाच्या वर्षात  'सकल राष्ट्रीय उत्पादन' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपीचा दर 1947 नंतर पहिल्यांदाच सर्वात निच्चांक पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे. यात सुधारणा करण्यासाठी काही नवी धोरणे आखावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. मूर्ती यांनी भारतातील डिजिटल क्रांती नेतृत्व या बंगळुरमधील आयोजित बेबिनारमध्ये देशातील अर्थिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. त्यांच्या या भाकितावरुन राहुल गांधी यांनी  मोदी है तो मुमकीन है! अशा शब्दात उपहासात्मक टोला लगावला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT