Monkeypox Outbreak 
देश

Monkeypox : चिंता वाढली! केरळात पहिला बळी, 15 जण क्वॉरंटाईन

सकाळ डिजिटल टीम

Monkeypox Outbreak : केरळमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षण असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते दरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याचे नमुने हे मंकीपॉक्ससाठी पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता चिंता वाढली आहे. केरळमध्ये एका 22 वर्षीय व्यक्तीचा 30 जुलै रोजी मृत्यू झाला होता. तो नुकताच UAE मधून परतला होता, जेथे त्याच्या नमुन्यांची चाचणी मंकीपॉक्ससाठी पॉझिटिव्ह आढळली होती.

या रुग्णाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, दरम्यान आज सोमवारी त्याचा निकाल आला. यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पंधरा जणांना देखील निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये चार मित्रांचा समावेश आहे, जे त्या तरुणाला विमानतळावरून घेण्यासाठी गेले होते, तसेच कुटुंबातील सदस्य आणि त्याची काळजी घेणारे आरोग्य कर्मचारी यांच्या देखील यामध्ये समावेश आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या की, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मंकीपॉक्स टेस्टचा अहवाल यूएईमध्ये पॉझिटिव्ह आला होता. ही व्यक्ती 22 जुलै रोजी भारतात आल्यानंतर त्याची मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली त्यात त्याचा आहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला 27 जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिकचा थकवा आणि एन्सेफलायटीसमुळे त्यांच्यावर त्रिशूरमध्ये उपचार सुरू होते. या मृत्यूबाबत आरोग्य विभागाने पुन्नूर येथे बैठकही बोलावण्यात आली असून, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यकींची संपर्क यादी तयार करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO) आतापर्यंत या आजाराचे 78 देशांमध्ये 18,000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच न्यूयॉर्कमध्येदेखील आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनानंतर नव्याने आलेल्या मंकीपॉक्स आजारामुळे येथे 1.50 लाखांहून अधिक नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारपर्यंत मंकीपॉक्सची 1,345 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात कॅलिफोर्निया 799 रूग्णांसह दुसऱ्या स्थानावर असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स आणि आरोग्य आयुक्त अश्विन वासन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT