Monsoon likely to make onset over Kerala around June 1 
देश

खूशखबर ! अखेर 'या' तारखेला केरळात दाखल होणार मान्सून

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सर्वासाठी अखेर खूशखबर आली असून मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळात दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने हा वर्तवला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्यामुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. देशभरात सर्वांनाच मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा आहे. मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत मान्सून पोहोचला आहे. पुढच्या ४८ तासात मालदीवचे आणखी काही भाग नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
------------
आरबीआय बॉँड्समध्ये गुंतवणूक करायची आहे? मग ही आहे शेवटची संधी...
------------
सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात; चीनचे स्पष्टीकरण
------------
...तर सोशल मीडिया कंपन्या बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
------------
दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात ३१ मे पर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मान्सून ठरलेल्या वेळेला एक जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला नाही तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना शक्य नाहीय, त्यांना जवळचा किनारा गाठण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने याआधी सहा जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असे म्हटले होते. पण आता तो १ जूनला दाखल होईल असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT