Monsoon rainfall hits Kerala right on time
Monsoon rainfall hits Kerala right on time 
देश

मान्सूनची केरळात हजेरी; 'या' दिवशी होणार महाराष्ट्रात आगमन

वृत्तसंस्था

मुंबई : केरळात मान्सूनने दणक्यात हजेरी लावली असून भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ७५ टक्के पावसाचा अंदाज आहे. तर, ३ ते ४ जूनच्या दरम्यान कोकणात मान्सून हजेरी लावणार असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने ३० मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं. पण भारतीय हवामान खात्याने ही माहिती फेटाळली होती. अशी घोषणा करण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं होतं.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यंदा मॉन्सून नेहमीपेक्षा थोडा उशिरा ५ जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे जाहीर केले होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. यामुळे मॉन्सूनचे वारे खेचून आणल्याने केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्याचे आज जाहीर करण्यात आले. देशभरात सध्या उष्णतेची लाट सुरू असताना सर्वांना सुखद बातमी समोर आली असून, गेले काही दिवस अंदमान समुद्रात थबकलेल्या मॉन्सूनने आपली आगेकूच सुरू केली होती.
------
कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी; कोणाला टाकले मागे?
------
आंदोलन चिघळले; ट्रम्प व्हाईट हाऊसमल्या संरक्षण बंकरमध्ये हलविले
------
दरम्यान काल (ता. ३१) मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याने कोकणसह राज्याच्या बहुतांश भागाला पुढील चार दिवस पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

यंदा मॉन्सूनचे अंदमानच्या समुद्रात १६ मे रोजी नेहमीपेक्षा चार दिवस अगोदर आगमन झाले होते. १७ मे रोजी तो आणखी थोडा पुढे सरकला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गेल्या दोन तीन दिवसांत जोरदार पुढे वाटचाल केली होती.त्यामुळे हवामान विभागाचा यावेळी अंदाज खरा ठरवत केरळमध्ये मॉन्सून १ जून रोजी दाखल झाला आहे. हवामान विभागाने देशातील मागील ३० वर्षाच्या मॉन्सूनच्या आगमनाच्या तारखांचा अभ्यास करुन विविध ठिकाणी मॉन्सूनच्या आगमनाच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत कोकणात इतर ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. विदर्भामध्येही विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT