Monsoon Updates Monsoon to arrive in Kerala on May 27
देश

weather Update : मान्सून २७ मे रोजी केरळात होणार दाखल

सकाळ डिजिटल टीम

कडक उन्हामुळे सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. यामुळे आतुरतेने वाट बघितली जात आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मान्सूनला (Monsoon) देशात दाखल होण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे २७ मे पर्यंत मान्सून केरळात (Kerala) दाखल होणार असा हवामान विभागाचा अंदाज हुकण्याची शक्यता होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात मान्सून २७ मे रोजी दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. (Monsoon to arrive in Kerala on May 27)

केरळमध्ये (Kerala) २७ मे रोजी मान्सूनची (Monsoon) सुरुवात अपेक्षित असून, यंदा ९९ टक्के पाऊस अपेक्षित आहे. पुढील ५ दिवसांत कोकण आणि गोवा प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. राज्याच्या इतर भागातही हलका पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईचे आयएमडी (IMD) प्रमुख जयंता सरकार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

मान्सून (Monsoon) तीन ते चार दिवसांपासून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला होता. त्यामुळे मान्सून २७ मे रोजी भारतात दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज (Weather Updates) चुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने केरळात (Kerala) मान्सून २७ मे रोजी दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विदर्भात तीन ते चार दिवस पावसाची शक्यता

मागच्या आठवड्यात केरळात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. आता पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील काही तासांत नैऋत्य वारे पुढे सरकणार आहे. त्यामुळे सकारात्मक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात आजपासून तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे. मंगळवारी पावसाने हजेरी लावली होती. तसेच वाराही सुटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT