Moradabad police 
देश

प्रेयसीला आधी शॉपिंगला नेले, नंतर केली हत्या; प्रियकर गजाआड

सिद्धार्थ लाटकर

मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये (moradabad) हाेणा-या वधूची (bride) तिच्याच वाग्दत वराने (groom) गळा आवळून खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. लग्नास (wedding) पाच दिवस बाकी असताना हा प्रकार झाल्याने वधूच्या कुटुंबिय शाेकसागरात बुडाले आहेत. दरम्यान पाेलिसांनी संशियतास अटक (arrests) केली असून हा खून विवाह (marriage) मान्य नसल्याच्या कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती उघड हाेत आहे. (moradabad-fiance-kills-woman-days-before-wedding-crime-news)

टीना आणि जतीन यांच्यात प्रेमसंबंध हाेते. त्यातूनच या दाेघांचा विवाह ठरला हाेता. हा विवाह मुरादाबाद येथे हाेणार हाेता. परंतु जतीला विवाह मान्य नसल्याचे कारण पुढे करीत त्याने टीनाचा खून केल्याचा आराेप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सोमवारी (ता.14) टीनाला जतीनचा फोन आला हाेता. त्याने आपल्याला लग्नासाठी काही साड्या खरेदी करायच्या आहेत असे सांगून तिला भेटण्यास बोलावले. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टीनाच्या आईने तिला नजीकच्या बसस्थानकावर नेऊन सोडले, असे लग्न समारंभासाठी आलेले टीनाचे नातेवाईक विपिन यांनी पाेलिसांना सांगितले.

जतीन घरी परत आला तेव्हा टीना त्याच्यासमवेत नव्हती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडू शकली नाही. याच दिवशी दुपारी अडीचच्या सुमारास पोलिसांना टीनाचा मृतदेह गावच्या वेशीबाहेर रस्त्यावर पडलेला दिसला हाेता. तपासाअंती पाेलिसांनी टीनाच्या कुटुंबाला माहिती दिली. जतीन यांना भेटल्यानंतर काही तासांतच टीना मृत झाल्याचे कळल्याने कुटुंबियांना धक्का बसला.

टीनाच्या कुटुंबीयांनी पाेलिसांना सांगितले या दाेघांचा प्रेम विवाह ठरला होता. जतीननला विवाहवर आक्षेप हाेता तर त्याने सांगितले पाहिजे हाेते. त्याने तसं आम्हांला स्पष्ट सांगितलं असतं तर मार्ग काढू शकलाे असताे.

कुटुंबीयांनी टीनाची ओळख पटविल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. जतीनने हा गुन्हा कशासाठी केला, याचा तपास पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT