mother preparing for the wedding to begin before that while fighting against china the soldier died a heroic death 
देश

घरात लग्नाची तयारी सुरू असताना आलं वीरमरण...

वृत्तसंस्था

सूरी (पश्चिम बंगाल) : घरामध्ये लग्नाची तयारी सुरू असताना जवान सीमेवर हुतात्मा झाला. राजेश ओरंग (वय 20) असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव. माझ्या मुलाने देशाची सेवा केली आणि देशासाठी बलिदान दिले, अशी भावना वीर पुत्राचे वडील सुभाष ओरंग यांनी व्यक्त केली.

भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये राजेश हुतात्मा झाले आहेत. बेल्जोरिया या गावातील एका शेतकऱ्याच्या घरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना देशसेवेची आवड होती. 2015 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 20 जवान हुतात्मा झाले आहेत. यामध्ये राजेश यांचा समावेश आहे. पाच दशकांत चीनबरोबरची ही सर्वात मोठी लष्करी चकमक आहे.

सुभाष ओरंग यांनी सांगितले की, 'लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी राजेशच्या मृत्यूची माहिती दिली. घरामध्ये दुःखद वातावरण आहे. पण, माझ्या मुलाने देशाची सेवा केली आणि देशासाठी बलिदान दिले, याचा आम्हाला अभिमान आहे. राजेश काही महिन्यांपूर्वी सुट्टीवर आला होता. घरामध्ये त्याच्या लग्नाची तयारी सुरू असताना वीरमरण आल्याची माहिती समजली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT