MP_Accident 
देश

ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाचा भीषण अपघात; १३ जणांचा जागीच मृत्यू

वृत्तसंस्था

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी (ता.२३) एक भीषण अपघात झाला. पुरानी छावनी परिसरात बस आणि रिक्षाचा भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात १३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ महिला आणि एका ऑटो रिक्षा चालकाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. १३ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, बस आणि रिक्षा यांचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील १२ महिला आणि ऑटो रिक्षाचालक यांचा मृतांमध्ये समावेश आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिली आहे. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी रिक्षातील मृतदेह बाहेर काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवून दिले असून अपघात कसा झाला, याचा तपास घेतला जात आहे. 

बस ग्वाल्हेरपासून मुरैनाकडे जात होती. दोन ऑटोरिक्षांमधून महिला प्रवास करत होत्या. पण एका रिक्षामध्ये बिघाड झाल्याने या सर्व महिला एकाच रिक्षाने निघाल्या होत्या. या १२ महिलांवर काळाने झडप घातली. 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. या दु:खद प्रसंगी आम्ही मृतांच्या परिवारासोबत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. आणि त्यांच्या परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना चौहान यांनी केली आहे. तसेच चौहान यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये मदतनिधी जाहीर केला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT