mp sambhaji raje asks to apologize ravi shankar prasad on chhatrapati shivaji maharaj statementqmp sambhaji raje asks to apologize ravi shankar prasad on chhatrapati shivaji maharaj statement 
देश

भाजपच्या मंत्र्यांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; संभाजीराजेंची माफीची मागणी 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केंद्रीय मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी माफीची मागणी करण्यात येत असून, राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील हा विषय उचलून धरला आहे. 

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
राज्यात आज सकाळपासून नाट्यमय घडामोडी सुरू आहेत. त्यावर भाजपकडून दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाष्य करण्यात आले. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही पत्रकार परिषद घेतली. त्यात रविशंकर प्रसाद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले आहेत. राज्यसभा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करून रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, संभाजीराजे छत्रपती हे भाजपनेच शिफारस केलेले राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

काय घडलं होतं पत्रकार परिषदेत?
रविशंकर प्रसाद यांनी दुपारी पत्रकार परिषद घेत, विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तसेच शिवसेनेवर टीका करताना, 'त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकारी नाही.' अशा अशयाचे वक्तव्य करताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केला. त्याचे पडसाद आता सोशल मीडियावर दिसू लागले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Gandhi Rare Painting: गांधीजींच्या तैलचित्राला विक्रमी किंमत; लंडनच्या ‘बोनहॅम्स’मध्ये १ लाख ५२ हजार पौंडांना विक्री

सोलापूर जिल्ह्यात हातभट्टीची वाढली नशा! ‘माझ्या नवऱ्याला दारू दिली तर मी इथेच फाशी घेईन’; 3 मुलांचा संसार सांभाळणाऱ्या असह्य विवाहितेचा हातभट्टी विक्रेत्याला इशारा

आजचे राशिभविष्य - 17 जुलै 2025

Panchang 17 July 2025: आजच्या दिवशी दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे

अग्रलेख : वास्तववादी पाऊल

SCROLL FOR NEXT