mukhtar abbas naqvi rahul gandhi.jpg 
देश

कोणत्या हंगामात काय पिकतं हे तरी माहिती आहे का?, नक्वींचा राहुल गांधींना टोला

सकाळ ऑनलाईन

नवी दिल्ली- पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीदरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ता येताच कृषी कायदा कचऱ्यात टाकू असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी समाचार घेतला आहे. तुम्हाला वाटेल तेव्हा संसदेत संमत झालेलं विधेयक लोकांसमोर फाडायला हे मम्मीजी किंवा मनमोहनजींचे सरकार नाही, हे कोणीतरी पप्पूला सांगितले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आहे. जे शेतकरी, गरीब आणि समाजातील उपेक्षित वर्गांसाठी विश्वासाने काम करते. अशा पद्धतीच्या राजकीय ढोंगीपणासाठी आमचे निर्णय बदलले जाऊ शकत नाहीत. ज्याचा वरचा मजला रिकामा आहे, अशी व्यक्ती अशा गोष्टी बोलतो. ते समजू शकत नाहीत की, आम्ही कशा पद्धतीने या मुद्द्यांचा सामना करत आहोत. त्यांना हे तरी माहीत आहे का की रब्बी आणि खरीप पिकांची कधी पेरणी केली जाते, अशी खोचक टीका त्यांनी केली. 

राहुल गांधी यांना पिकांबाबत कोणतीच माहिती नाही आणि ते शेतकऱ्यांच्या हिताबाबत बोलत आहेत. त्यांचा वरचा मजला रिकामा आहे. कोणता विषय कोणासमोर मांडायचा हे त्यांना समजत नाही. ज्याला पिकांबाबत माहीत नाही तो कृषी कायद्यावर काय बोलणार, असे ते म्हणाले. 
हेही वाचा- गुजरात दंगलीचे डाग ते विकासपुरुष; 'सरकारप्रमुख' म्हणून मोदींचा विसाव्या वर्षांत प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT