Mukhtar Ansari Net Worth mafia politician total property net worth weapons details  
देश

Mukhtar Ansari Net Worth : जेलमध्ये बसून निवडणूक जिंकणारा माफिया डॉन... जाणून घ्या किती होती मुख्तार अंसारीची संपत्ती?

Mukhtar Ansari Net Worth : माफिया डॉन आणि माजी आमदार मुख्तार अंसारी याचा गुरूवारी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

रोहित कणसे

Mukhtar Ansari Net Worth : माफिया डॉन आणि माजी आमदार मुख्तार अंसारी याचा गुरूवारी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अंसारी मागील तीन वर्षांपासून तुरूंगात बंद होता. अंसारीच्या मृत्यूनंतर गुन्हेगारी जगतातील एक युगाचा शेवट झाला आहे.

मुख्तार अंसारीच्या मृत्यूनंतर सगळीकडे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान गुन्हेगारी जगत आणि राजकारण यांच्या माध्यमातून त्याने कमावलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची देखील सध्या चर्चा आहे.

सरकारी एजन्सींनी मुख्तार याच्याकडून २०२० मध्ये ६०८कोटींची अवैध संपत्ती जप्त केली होती. मुख्तार अंसारीने शेवटची निवडणूक २०१७ मध्ये जेलमधून लढवली आणि जिंकली देखील होती. तो पाच वाळा आमदार राहील. त्याने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्याच्याकडे एकूण २१.८८ कोटी रुपयांची संपत्ती होती, यापैकी अधिकतर म्हणजेच २० कोटी रुपये रियल इस्टेटमध्ये होती.

मुख्तार अंसारी आणि त्याची पत्नी या दोघांकडे तब्बल ३.२३ कोटी रुपये किंमतीची जमीन होती. याशिवाय, त्यांच्याकजे ४.९० कोटी रुपयांचे प्लॉट्स होते. शेतजमीनीसोबतच त्यांच्या कुटुंबाकडे अनेक कमर्शियल बिल्डिंग्ज देखील आहेत. ज्यांची किंमत २०१७ मध्ये १२.४५ कोटी होती. तसेच १.७० कोटी रुपये किंमतीची घरे देखील आहेत. तसेच मुख्तार याच्यावर ६.९१ कोटींचं कर्ज देखील होतं. मुख्तार अंसारी २०१५-१६ मध्ये एकूण उत्पन्न १७.७५ लाख रुपये होतं. याखेरीज त्याच्या २ आश्रितांची कमाई २.७५ लाख आणि ३.८३ लाख रुपये होती.

२०१७ सालच्या उत्तर प्रदेश निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे तीन प्रमुख बँकांमध्ये खाते होते. त्यापैकी एसबीआयमध्ये वयक्तीक खातं होतं. तर पत्नीचे एसबीआय, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि एचडीएफसी बँकेत खाते होते. याशिवाय मुलांते खाते आयसीआयसीआय बँक आणि ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स मध्ये होते. २०१७ मध्ये या खात्यांमध्ये एकूण १०.६१ लाख रुपये जमा होते. याशिवाय ३.४५ लाख रुपये नगदी, बीमा स्वरुपात १.९० लाख रुपये गुंतवलेले होते. त्याच्या कुटुंबाकडे एकूण ७२ लाख रुपये किंमतीचं सोनं होतं. त्याच्याकडे २७.५० लाख रुपये किंमतीचे एक एनपी रिवॉल्व्हर, एक बंदूक आणि रायफल सारखे हत्यारं देखील होते.

मुख्तार अंसारीविरोधात हत्या ते वसूली असे ६५ गुन्हे दाखल होते. तरीही तो वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून पाच वेळा विधानसभेवर निवडणून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT