Air India New York-Delhi Flight Case esakal
देश

Air India Case : विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणाऱ्याचा Photo आला समोर; आरोपी बड्या कंपनीत आहे उपाध्यक्ष!

एअर इंडियाच्या विमानात मिश्रानं मद्यधुंद अवस्थेत कपडे काढून एका महिलेवर लघवी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Air India New York-Delhi Flight Case : एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली विमानात लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत पोहोचलेत. ते आता मिश्राच्या नातेवाईकांना भेटणार आहेत.

26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात 77 वर्षीय महिलेवर लघवी करणाऱ्या व्यक्तीचं नाव शंकर मिश्रा असं आहे. न्यूयॉर्क ते नवी दिल्ली या एअर इंडियाच्या बिझनेस क्लास फ्लाइटमध्ये आरोपी शंकर मिश्रा (Shankar Mishra) यानं मद्यधुंद अवस्थेत आपल्या सहप्रवाशावर लघवी केली.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शंकर मिश्रा विरोधात एफआयआर नोंदवला असून त्याच्या अटकेसाठी लूकआउट सर्कुलरची मागणी केलीये. या प्रकरणात नाव आल्यानं शंकर मिश्रा फरार आहे. याप्रकरणी दिल्ली पोलीस शंकर मिश्राला लवकरात लवकर अटक करणार आहे. दरम्यान, शंकर मिश्राच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी दिल्ली पोलीस मुंबईत पोहोचले आहेत.

शंकर मिश्रा हे वेल्स फार्गो (Wells Fargo) या अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनीच्या इंडिया चॅप्टरचे उपाध्यक्ष आहेत. वेल्स फार्गोचे मुख्य कार्यालय कॅलिफोर्निया इथं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, शंकर मिश्रा यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये असं म्हटलंय की, ते मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतात. मात्र, आदल्या दिवशी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये शेखर मिश्रा असं आरोपीचं नाव असल्याचा दावा करण्यात आला होता. शंकर मिश्रा हे मुंबईतील मीरा रोडचे रहिवासी आहेत.

'या' कलमान्वये शंकर मिश्राविरुद्ध गुन्हा दाखल

शंकर मिश्रा विरुद्ध IPC कलम 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य), 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूनं तिच्यावर हल्ला किंवा बळजबरी करणं), 509 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूनं अश्लील शब्द, हावभाव किंवा कृत्य करणं) आणि 510 ( मद्यधुंद व्यक्‍तीकडून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन), तसंच विमान नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT