Cab Driver killed Man in Chennai Cab Driver killed Man in Chennai
देश

कॅब चालकाने केली हत्या; OTP सांगण्यापूर्वीच मुले कारमध्ये बसल्याचा राग

सकाळ डिजिटल टीम

चेन्नई : वीकेंडला एक व्यक्ती कुटुंबासोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. परत येताना त्याने कॅब बुक केली. ठरलेल्या वेळेनुसार कॅबही पोहोचली. मात्र, कॅब चालकाला ओटीपी सांगण्यापूर्वीच मुलं गाडीत जाऊन बसली. यामुळे चालकाचा राग आला आणि त्याने व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. चेहऱ्यावर मारल्याने व्यक्तीच्या नाकातून रक्त निघाले. नंतर फोन डोक्यावर मारला. रुग्णालयात नेत असताना व्यक्तीचा मृत्यू (Murder) झाला. पोलिसांनी आरोपी कॅब चालकाला अटक केली आहे. एच उमेंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोईम्बतूरमधील खाजगी कंपनीत अभियंता असलेले एच उमेंदर हे वीकेंडला पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. चित्रपट पाहून नवलूर येथील मॉलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कॅब बुक केली. कॅब आल्यावर मुलं गाडीत चढू लागले. यावर कॅब चालक (Cab Driver) एन रवीने (४१) आक्षेप घेतला. सात लोकांच्या कुटुंबासाठी मोठे वाहन बुक करावे लागेल.

दोघांचे संभाषण सुरू असताना मुलं गाडीच्या आत बसले. यामुळे कॅब चालक रवीला राग आला. त्याने मुलांना खडसावले आणि गाडीतून उतरण्यास सांगितले. यावरून उमेंद्र आणि रवीमध्ये वाद झाला. ओटीपी न सांगता कुटुंबीयांना कॅबमध्ये प्रवेश करता येणार नाही, असे चालक रवीने सांगितले. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत (Fighting) झाले.

खुनाचा गुन्हा दाखल

रागाच्या भरात रवीने फोन उपेंद्रच्या डोक्यावर मारला. इतकंच नाही तर कॅब चालक रवीने उपेंद्रच्या तोंडावरही मारले. यामुळे उपेंद्रच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला. घाईघाईत उपेंद्रला कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत (Murder) घोषित केले. यावेळी लोकांनी कॅब चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

Asia Cup 2026: BCCI ने सांगितलं अन् टीम इंडियाने केलं! मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी न घेण्यावर कोच मुजुमदार यांचं स्पष्ट उत्तर

Maharashtra ST: एसटी प्रवाशांसाठी मोठी गुड न्यूज! ताफ्यात येणार ५ हजार नव्या ‘लालपरी’; ‘टाटा मोटर्स’ची निविदेत बाजी

“रुबाब आहे!” कोकणच्या निसर्गात रमली ‘सनई चौघडे’ फेम शर्वरी; म्हणाली...“मी जवळजवळ स्वर्गात…”

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

SCROLL FOR NEXT