Madhya Pradesh murder news Madhya Pradesh murder news
देश

थोरल्या मुलाच्या आत्महत्येनंतर मिळाले १ कोटी, पण धाकट्याने केली हत्या

सकाळ डिजिटल टीम

शिवपुरी : महेश गुप्ता (५५, रा. शिवपुरी जिल्हा, मध्य प्रदेश) यांची २२ जुलै रोजी गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली होती. गोळी झाडली तेव्हा महेश गच्चीवर झोपले होते. कुटुंबीयांनी वर जाऊन बघितले असता महेश गुप्ता यांचा मृतदेह दिसला. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हत्येचा छडा लावत आरोपी मुलाला अटक केली.

मृत महेश यांचा मोठा मुलगा अनिल याने घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. अनिल सैन्यात असल्याने कुटुंबाला लष्कराकडून सुमारे एक कोटीच्या विम्यासह आर्थिक मदत मिळाली. महेश यांचा लहान मुलगा अंकित (२५) हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तो दारू विक्रीपासून मद्यपान आणि जुगार खेळण्यापर्यंतच्या कामात गुंतला होता, असे पोलिस अधीक्षक राजेश सिंह चंदेल यांनी सांगितले.

अंकितचा नितीन लोधी (२०) हा मित्र होता. नितीनला कुटुंबीयांनी खर्चासाठी पैसे दिले नाही. त्यामुळे तोही नाराज होता. यामुळे नितीन व अंकित यांनी अपहरणाचा कट रचला आणि गुंडांचा ऑनलाइन शोध सुरू केला. त्यांची बिहारमधील १८ वर्षीय गुंड अजित चौहानशी भेट झाली. दोघांनी मेडिकल स्टोअरच्या दुकानदाराच्या मुलाचं अपहरण करण्याचा कट रचला आणि त्याची सुपारी अजित चौहानला दिली.

यानंतर गुंड अजित चौहान पिचोरे येथे पोहोचला. त्याने अंकित व नितीनला पैशांची मागणी केली. परंतु, पैसे न मिळाल्याने अपहाराची योजना रद्द केली. यामुळे चिडलेल्या अंकित चौहानने एक लाखाची मागणी केली. पैशांची गरज असल्याने अंकितने वडिलांची हत्या (Murder) करण्याची योजना आखली. अंकितने वडिलांच्या हत्येची सुपारी अजित चौहानला दिली.

२१ जुलै रोजी अंकितने रात्री दोन वाजताच्या सुमारास गुंडाला घरी बोलावून तिसऱ्या मजल्यावर नेले. तेथे गुंडाने अंकितच्या समोरच वडिलांवर गोळ्या (Firing) झाडल्या. त्यानंतर अंकितने गुंडाला घराबाहेर काढले. सकाळी सहा वाजता अंकितने पोलिसांना वडिलांच्या हत्येची खोटी गोष्ट सांगितली. परंतु, पोलिसांनी खुनाचा छडा लावला. तसेच अंकित गुप्ता, मित्र नितीन लोधीसह गुंड अजित चौहानला अटक केली. पोलिसांनी हत्येत वापरलेले पिस्तूलही जप्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीदरम्यान कोर्टात काय घडलं? संजय राऊतांना जिंकण्याचा विश्वास, म्हणाले...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vastu Tips: पाकिटात काय ठेवावे आणि काय ठेवू नये? वास्तुशास्त्राचे 'हे' उपाय दूर करू शकतात पैशांची अडचण!

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

SCROLL FOR NEXT