Murder Murder
देश

संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या

सकाळ डिजिटल टीम

अनाठायी प्रेमात पडलेल्या वेड्या प्रियकराने बीएमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा गळा चिरून खून (Murder of a girl in a public place) केला. हत्येनंतर आरोपीने थेट पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. तसेच हत्येसाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात घडली.

बीएच्या तृतीय वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी ठाकुराद्वारा परिसरातील झंकार गली येथे राहते. ती बाजारातून सामान घेऊन घरी परत जात होती. विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने तिला वाटेत अडवले. ‘माझ्याशी लग्न कर नाही तर तुला ठार मारीन’ अशी धमकी दिली. धमकी दिल्यानंतरही विद्यार्थिनीने लग्नास नकार दिला. यामुळे चिडलेल्या युवकाने भर रस्त्यात तिचा गळा (Murder of a girl in a public place) चिरला.

गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला आजूबाजूचे नागरिक रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिचा वाटेतच मृत्यू (Murder) झाला. आरोपी स्वत: कोतवालीला पोहोचला आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वी आरोपीने तिच्या घरी जाऊन संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. संबंध न ठेवल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.

प्रेमप्रकरणातून हत्या

प्रेमप्रकरणातून विद्यार्थिनीची हत्या (Murder) करण्यात आली. आरोपीला अटक (Accused Arrested) करण्यात आली आहे. गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येत आहे, असे एसपी नीरज कुमार जदौन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT