small child murder small child murder
देश

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने केला चिमुकल्याचा खून; माहेरी राहिली गरोदर

सकाळ डिजिटल टीम

एका महिलेने दीड वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केला. पतीने मुलाची डीएनए चाचणी करण्याची मागणी केल्यानंतर आणि मुलाचा वडील होण्यास नकार दिल्यानंतर महिलेने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील अनुपपूर जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बिजुरी भागात घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री २६ वर्षीय महिला खोलीतून बाहेर आली आणि म्हणू लागली की तिचा मुलगा प्रतिसाद देत नाही. यावेळी कुटुंबीयांनी खोलीत जाऊन बघितले असता मुलाच्या नाकातून रक्त येत होते. यानंतर कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. तपास सुरू केल्यानंतर मुलाच्या वडिलाला पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) असल्याचे समजले, असे कोटमाचे उपविभागीय पोलिस अधिकारी एसएस बघेल यांनी सांगितले.

पत्नी माहेरी गेली असता गरोदर राहिली. यामुळे पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला. यामुळे तो मुलाला स्वीकारण्यास नकार देत होता. तसेच त्याला मुलाची डीएनए चाचणी करायची होती. यामुळे कंटाळलेल्या पत्नीनेच मुलाचा गळा दाबून खून (murder) केला. शवविच्छेदन अहवालात महिलेनेच मुलाचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती बघेल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT