mutton shop owner was shot dead by two bike borne assailants in broad daylight in Bihar  
देश

Video: पोलिसांची कसलीच भीती नाही! बिहारमध्ये भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मटन शॉप मालकाला दोन बाईकस्वारांनी भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून ठार मारलं आहे

कार्तिक पुजारी

पाटणा- बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मटन शॉप मालकाला दोन बाईकस्वारांनी भर दिवसा डोक्यात गोळ्या घालून ठार मारलं आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो व्हायरल होत आहे. (mutton shop owner was shot dead by two bike borne assailants in broad daylight in Bihar Muzaffarpur)

मृत व्यक्तीचं नाव अफरोज खत्री असल्याचं कळंतय. तो रामबाग चौकात एक मटन शॉप चालवतो. खत्री सकाळी आपल्या दुकानाकडे जात असताना ही घटना घडली. हल्लेखोरांनी दोन गोळ्या खत्री यांच्या डोक्यात घातल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सीटीटीव्ही फूटेजमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती रस्त्यावरुन जात आहे. दोन बाईकस्वार त्याच्या मागून येत आहेत. त्यातील मागे बसलेला व्यक्ती बंदूक काढतो आणि रस्त्यावरुन चालणाऱ्या व्यक्तीला निशाणा बनवून गोळी चालवतो. यात गोळी लागलेला व्यक्ती रस्त्यावर पडतो. दरम्यान, हल्ल्यामागचा हेतू समजू शकलेला नाही. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. स्थानिक लोक घटनास्थळी जमा झाले. सर्व प्रकार पाहून ते आक्रमक झाले. पोलिसांना देखील त्यांनी सुरुवातील मृतदेहाजवळ येऊ दिलं नाही. मध्यस्थीनंतर पोलिसांनी मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवलं आहे. काही काळ परिसरात तणावाची स्थिती होती. मात्र, पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT