Supriya Sule Amit Shah
Supriya Sule Amit Shah Sakal
देश

MVA MPs meet Amit Shah: सीमावादावर तोडग्याचा मुहूर्त ठरला! मविआ-अमित शहांच्या भेटीत काय घडलं?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासह गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरुन राज्यात मोठं वादंग निर्माण निर्माण झालं होतं. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली. यानंतर शहांनी सकारात्मक भूमिक घेतल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. (MVA MP meet Amit Shah Supriya Sule gives info about Maharashtra Karnataka row)

खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अमोल कोल्हे, विनायक राऊत, राजन विचारे, अरविंद सावंत आदींनी शहांची भेट घेतली. भेटीनंतर मीडियाशी बोलताना सुळे म्हणाल्या, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, कर्नाटकचे मुख्यमंत्र्याचं प्रक्षोभक विधान, छत्रपतींच्याबद्दल सरकारमधील लोकांची बेतालं विधानं, सत्तेतील वाचाळवीर तसेच राज्यपाल जे काही बोललेत त्याबद्दल आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून शहांना माहिती दिली आहे.

मला विश्वास आहे की गृहमंत्री अमित शहा काहीतरी मार्ग काढतील. गुजरातचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढला जाईल असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं माझा विश्वास आहे की यामध्ये केंद्राचा लवकरच हस्तक्षेप होईल. आम्हाला विश्वास आहे की, गृहमंत्री पक्षपातीपणा करणार नाहीत. त्यामुळं पुढच्या आठवड्यात काय होतंय ते पाहुयात.

हे ही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होऊन तीन दिवस झाले पण सत्तेत असलेल्या कोणत्याही खासदारानं महाराष्ट्र, छत्रपती, समीवाद या विषयावर सभागृहात बोललेलं मला दिसलं नाही. त्यामुळं अतिशय असंवेदनशीलपणे हे ईडीचं सरकार वागतंय. सीमावादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे, अशी माझी सुरुवातीपासूनची मागणी आहे. पण आत्ताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधीपक्षांना विश्वासात घेऊन कृती करताना दिसत नाही. ते कुठलाही स्टॅड घेत नाहीत हे दुर्देवी आहे, अशा शब्दांत सु्प्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT