Chandrababu Naidu esakal
देश

N. Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांनी चौकशीत सहकार्य केलं नाही; पोलिसांचा आरोप

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - कथित कौशल्य विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी चौकशीदरम्यान सहकार्य केले नाही, असे गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) म्हटले आहे.

प्रश्नांची अस्पष्ट उत्तरे देताना त्यांनी काही गोष्टी आठवत नसल्याचे सांगितले. नायडू यांना एका कथित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) न्यायालयात हजर करण्यात आले.

नायडू यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी करताना, रिमांड अहवालात म्हटले की, आंध्र प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांना नांद्याल येथून विजयवाडा येथे नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. परंतु विरोधी पक्षनेते नायडू यांनी ते वापरण्यास नकार दिला होता.

पोलिसांच्या अहवालात म्हटले की कार्यकर्त्यांनी अनेकवेळा ताफा थांबवला होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. नायडू यांना फाईल नोटसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. परंतु त्यांनी प्रश्नांची उत्तरे देताना सहकार्य केले नाही. तसेच अस्पष्ट उत्तरे दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT