Priyanaka Gandhi
Priyanaka Gandhi 
देश

राजीव गांधींची मारेकरी नलिनीने सांगितली प्रियांका गांधींच्या भेटीची घटना; म्हणाली आश्रू...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) आणि इतर दोषींची शनिवारी तामिळनाडू तुरुंगातून सुटका करण्यात आली. हे सर्व दोषी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. तब्बल ३१ वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झालेल्या नलिनीने रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने काँग्रेसनेत्या प्रियांका गांधी यांनी कारागृहात घेतलेल्या भेटीबद्दल माहिती दिली.

राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी ठरलेल्या नलिनीने प्रियांका गांधी तुरुंगात भेटण्यासाठी आल्या तेव्हाच्या घटनेची आठवण सांगितली. नलिनी म्हणाली की, वडिलांच्या हत्येबद्दल विचारल्यानंतर प्रियांका यांना आश्रू अनावर झाले होते. त्या प्रियंका कारागृहात ओक्साबोक्शी रडल्या होत्या.

नलिनी पुढं म्हणाली की, प्रियांका गांधी या अतिशय दयाळू व्यक्ती आणि देवदूत आहेत. नलिनी ही देशातील सर्वात जास्त काळ जन्मठेपेची शिक्षा भोगणारी पहिली महिला कैदी आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणातील नलिनीसह सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (११ नोव्हेंबर २०२२) दिले.

नलिनी म्हणाली, मी 32 वर्षांत तुरुंगातला नरक अनुभवलाय. मात्र, माझ्यातल्या विश्वासानं मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं आहे. कारण, मी निर्दोष आहे. तुरुंगात नियमितपणे योगा केल्याने मी स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकले.' आता आपली सुटका झालीय, तुम्ही गांधी कुटुंबातील (Gandhi Family) कोणाला भेटणार आहात का? असं विचारलं असता नलिनी म्हणाली, माझी अशी कोणतीही योजना नाहीये. माझा नवरा जिथं जाईल तिथं मी जाईन,' असंही तिनं सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुणे अपघातातील आरोपींच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन? धक्कादायक माहिती समोर...

Video: 'सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्ती पोहोचला EVM ठेवलेल्या ठिकाणी'; निलेश लंकेंनी व्हिडिओ ट्वीट केल्याने खळबळ

USE vs BAN 1st T20I : अमेरिकेने बांगलादेशला चारली पराभवाची धूळ अन् रचला इतिहास

Pune Porsche Accident: करोडोंची कार वापरणाऱ्या अग्रवालने सतराशे रुपयांसाठी रखडवलेले पोर्शेचे रजिस्ट्रेशन

Latest Marathi News Live Update: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर

SCROLL FOR NEXT