Namaste Trump us president donald trump speech ddlj sholey sachin tendulkar virat kohli 
देश

Namaste Trump:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात, सचिन, विराटसह डीडीएलजे आणि शोलेचाही उल्लेख

सकाळ डिजिटल टीम

अहमदाबाद (गुजरात) Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आज, गुजरातमध्ये जल्लोषी स्वागत करण्यात आले. हजारोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने मोटेरा स्टेडियमवर त्यांनी भारतीय संस्कृती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुती सुमनं उधळली. पंतप्रधान मोदी कष्टाळू आणि धेय्यवादी व्यक्तीमत्व असल्याचे सांगतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी, भारतीय सण, क्रिकेट, सिनेमा यांचाही उल्लेख केला. महान क्रिकेटपटून सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसह त्यांनी डीडीएलजे आणि शोले या सिनेमांचाही उल्लेख केला. 

तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाविषयी प्रचंड उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर ट्रम्प यांचे भाषण झाले. ट्रम्प यांच्या प्रत्येक वाक्याला उपस्थितांमधून टाळ्या मिळत होत्या. भारतीय संस्कृतीला लाभलेला वारसा, भारतातील सण-उत्सव, क्रीडा परंपरा या सगळ्यांचा उल्लेख करत, ट्रम्प यांनी भारतीयांनी केलेल्या जंगी स्वागताबद्दल आभार मानले.

'अमेरिका भारताचा आदर करते'
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'भारत असा देश आहे की, ज्या देशातील बॉलीवूडनं संपूर्ण जगाला भूरळ घातलीय. जगात आजही डीडीएलजे आणि शोले सारखे सिनेमा आवडीनं पाहिले जातात. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारखे महान क्रिकेटपटू भारतातच तयार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचा स्वाभिमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर जे काही मिळवलंय ते, संपूर्ण जगापुढं एक उदाहरण आहे. जर, कष्टाची तयारी असेल तर भारतीय व्यक्ती त्याला हवी ती कोणतिही गोष्ट मिळवू शकतो, हे पंतप्रधान मोदींनी दाखवून दिलंय. याच भारतात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे.' भारत आणि अमेरिका यांच्या नात्याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'अमेरिकेचं भारतावर प्रेम आहे, आम्ही भारताचा आदर करतो. अमेरिका यापुढेही कायम भारताचा एक विश्वासू मित्र राहिल, असंही ट्रम्प यांनी या वेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela 300 Trees Cutting : पर्यावरणवाद्यांच्या विरोधाला झुगारून नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३०० झाडांची कत्तल, वातावरण चिघळणार

Aadhaar News : आधार कार्ड वरुन जारी जन्मदाखले होणार रद्द, सरकारचा मोठा निर्णय; नवं बर्थ सर्टिफिकेट मिळवण्याची 'ही' आहे सोपी प्रोसेस

वाघाचा संचार असलेल्या क्षेत्रात बेशुद्ध पडल्या गीताबाई; चार दिवसानंतर सापडल्या अन्..

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही : एकनाथ शिंदे, बहिणींकडे दुर्लक्ष केल्याने ही वेळ आल्याचा विरोधकांना टोला

VIDEO : 'कायदा सर्वांसाठी समान, मग तुम्ही का मोडता? चुकीचा यू-टर्न घेतल्यावर महिलेने भरचौकात पोलिसांनाच सुनावलं; प्रकरण गेलं थेट ठाण्यात...

SCROLL FOR NEXT