Bilkis dadi 
देश

शाहिनबागच्या 'प्रभावशाली' आंदोलनकर्त्या बिलकीस दादी म्हणतात, 'मोदी माझ्या मुलासारखेच!'

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शाहिन बागमध्ये आंदोलन झालं होतं. भारतात या कायद्याला जोरदार विरोध झाला होता. मात्र, दिल्लीतील शाहिन बागमधील आंदोलन हे चांगलेच गाजले होते. या आंदोलनाचा चेहरा म्हणून बिल्किस दादी या प्रसिद्धिस आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वीच 'टाइम' या प्रसिद्ध नियतकालिकाने जाहिर केलेल्या जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तिमत्वामध्ये बिल्कीस दादी यांचाही समावेश करण्यात आला आहे. 

टाइम हे जगप्रसिद्ध नियतकालिक असून दरवर्षी ते जगातील प्रभावशाली अशा 100 व्यक्तींच्या नावाची यादी जाहिर करते. यंदाही टाइमने ही यादी जाहिर केली आहे. यामध्ये अभिनेता आयुष्यमान खुराणा, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, रविंदर गुप्‍ता, बिलकिस दादी आणि नरेंद्र मोदी या काही भारतीयांचा समावेश आहे. 
आपलं नाव प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी म्हटलं की, नरेंद्र मोदी हे त्यांच्या मुलासारखेच आहेत. त्यांनी मला भेटायला बोलावलं तर मला आनंद होईल. 

गेल्या वर्षी संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा पारित झाल्यानंतर या कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने झाली होती. शाहिनबागमधील आंदोलनात सामील असणाऱ्या बिल्कीस दादी यांनी म्हटलं होतं की, कितीही कडक थंडी असो वा पाऊस कोसळो, आम्ही आमचे आंदोलन सुरुच ठेवू. जामिया विद्यापीठात आमच्या मुलांना मारलं गेलं तेव्हाही आम्ही मागे हटलो नाही. आमच्या समोर गोळ्या झाडल्या गेल्या पण आम्ही मागे हटलो नाही. 

बिल्कीस दादी यांना जेव्हा विचारलं गेलं की, जर पंतप्रधानांनी त्यांना भेटीचं आमंत्रण दिलं तर त्या जातील का? यावर त्या म्हणाल्या की, मी जरुर जाईन. यात घाबरण्यासारखं काय आहे? त्यांनी पुढे म्हटलं की, नरेंद्र मोदी हे माझ्या मुलासारखेच तर आहेत. मी त्यांच्या आईसारखीच आहे. टाइमच्या यादीत मोदींचं नाव आल्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

Maharashtra Drought: दुष्काळाच्या निकषांत बदल! ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान झाल्यास गाव पात्र; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Jayram Ramesh: महागाईवरून जयराम रमेश यांचा केंद्रावर निशाणा; डाळी, तेल, मसाले आणि कांद्याच्या दरवाढीचा दावा

Maharashtra Weather Forecast : परतीचा मान्सून बरसणार! पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा अन् विदर्भात पावसाचा इशारा, आज २४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Railway : हडपसर-हरंगूळ, नांदेड एक्स्प्रेसचे तीन डबे वाढणार

SCROLL FOR NEXT